घरदेश-विदेशखरे ड्रामेबाज तर काँग्रेसच आहे; निर्मला सीतारामन यांची जोरदार टीका

खरे ड्रामेबाज तर काँग्रेसच आहे; निर्मला सीतारामन यांची जोरदार टीका

Subscribe

सरकारकडून जारी करण्यात आलेले आर्थिक पॅकेज एक नाटक असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे, पण खरे ड्रामेबाज तेच आहेत. राहुल गांधी रस्त्यावर बसून त्यांच्याशी चर्चा करतात आणि त्यांचा वेळ उगाचच वाया घालवतात. यापेक्षा त्यांनी मजुरांच्या मुलांना आणि सामान घेऊन त्यांच्यासोबत चालून त्यांची मदत करायला हवी होती, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. स्वावलंबी भारत पॅकेजबद्दल माहिती देण्यासाठी रविवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाचवी आणि शेवटची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना विरोधी पक्ष काँग्रेस संदर्भातही काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी सीतारामन यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर आपल्याला एकत्र काम करावे लागेल. मी सोनिया गांधी यांना हात जोडून विनंती करते की त्यांनी आमच्याशी चर्चा करावी आणि या मुद्यावरून राजकारण करू नये. स्थलांतरित मजुरांची जबाबदारी त्यांनी समजून घ्यायला हवी.

- Advertisement -

मी विरोधी पक्षांना हात जोडून विनंती करते की, स्थालांतरितांसाठी एकत्र येऊन काम करायला हवे. विरोधी पक्ष अशी टीका करत आहेत की जसं त्यांची सत्ता असलेल्या राज्यात स्थलांतरितांचे सर्व प्रश्न सूटले आहेत. मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना विनंती करते. जबाबदारीची जाणीव ठेवा, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे किंवा त्यांच्या मित्रपक्षाची सत्ता आहे तिथे त्यांनी स्थलांतरित मजुरांसाठी ट्रेन मागवावी. केंद्र सरकारकडून ट्रेनमार्फत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात येईल. काँग्रेसने ट्रेन मागवून स्थलांतरित मजुरांची ट्रेनने रवानगी करावी, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित करताना पहिल्याच दिवशी सांगितले होते की, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, तुमच्या जेवणाची आणि राहण्याची सर्व सुविधा केली जाईल. पंतप्रधानांनी सांगितल्यानुसार आम्ही प्रामाणिकपणे शक्य होईल तितकं त्यांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला, असे सीतारामन यांनी सांगितले.

- Advertisement -

स्थलांतरित मजुरांच्या अन्न आणि निवार्‍याची संपूर्ण योजना केली गेली होती. यामध्ये गुरुद्वारे, सामाजिक संस्थादेखील सरकारला सहकार्य करत सहभागी झाले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री यांच्यात बैठक पार पडल्यानंतर मजुरांना आपापल्या घरी सोडण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर सर्व स्थलांतरित मजुरांना आपापल्या घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही सीतारामन म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -