घरताज्या घडामोडीGen Bipin Rawat Chopper Crash : छत्रपती घराण्याशी बिपीन रावतांचे जिव्हाळ्याचे संबंध,...

Gen Bipin Rawat Chopper Crash : छत्रपती घराण्याशी बिपीन रावतांचे जिव्हाळ्याचे संबंध, खासदार संभाजीराजे छत्रपतींकडून आठवणींना उजाळा

Subscribe

जनरल बिपीन रावत हे आपल्यामधून निघून गेले आहेत. माझ्यासाठी आणि देशासाठी खूप मोठा धक्का आहे. प्रथमत: मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. छत्रपती घराण्यांचे त्यांचे जिवाचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ३ वर्षांच्या अगोदर व्यापक स्वरूपात दिल्लीत सुरू व्हावी. तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. शिवाजी महारांजांची स्ट्रॅटेजी जर आपण पाहिली तर प्रमुख पाहुणे कोण असावेत. राष्ट्रपती, नौदल आणि लष्करप्रमुख असावेत. असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे खासदर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच त्यांनी जनरल बिपीन रावत यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, राष्ट्रपती कार्यक्रमाला येतात. तर तुम्ही पण यावं अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर त्वरित त्यांनी मला होय असा प्रतिसाद दिला. त्यानंतर मी त्यांना धन्यवाद म्हणून निघालो. जेव्हा मी निघत होतो तेव्हा त्यांनी मला थांबवलं. आमच्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल अनेक गोष्टींची चर्चा झाली. शिवाजी महाराजांच्या आचार आणि विचारांनी आम्ही काम करतो ते मला त्यांना दाखवून द्यायचं होतं. परंतु ते बोलताना सुद्धा म्हणत होते की, जेव्हा मी ठरवतो तेव्हा मी त्वरीत निर्णय घेतो. मी कधीही मागे जात नाही. हीच शिवाजी महाराजांची सर्व स्ट्रॅ़टेजी होती. तसेच त्यांचे जे विचार होते. ते संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल होते.

- Advertisement -

ज्यावेळी मी त्यांना म्हटलं मी की राष्ट्रपती फेटाळलं. ते मी बांधणार आहे. कारण बोरक्या डोक्यांनी आपण शिवाजी महाराजांच्या जयंतीला जाऊच शकत नाही. त्यावेळी ते मला म्हणाले की, काळजी करू नका मी फेटा बांधून येईन. त्यानंतर मी त्यांना म्हटलं मी एक माणूस फेटा बांधायला पाठवू का? तेव्हा ते म्हणाले की, नको मला स्वत:ला फेटा बांधता येतो. त्यामुळे शिवजयंतीला लष्कर प्रमुखांनी जो फेटा बांधलाय. तेव्हा स्वत: लष्कर प्रमुखांनी बांधला आहे.

ज्यावेळी त्यांनी मी दिल्लीला बोलावलं तेव्हा सुद्धा आमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि ताराराणी यांच्याबद्दल गोष्टी रंगल्या. जेव्हा त्यांनी मला ताराराणी यांच्याबद्दल विचारलं तेव्हा मी त्यांच्याबद्दल सर्व माहिती त्यांना सांगितली. असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.

- Advertisement -

पुढे त्यांनी सांगितलं की, ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला होता. तेव्हा सांगली आणि कोल्हापूरात विमान उतरू शकत नव्हते. त्यामुळे खूप अडचणी येत होत्या. परंतु मी त्यांची मदत मागितली असता. त्यांनी मला तात्काळ फोन केला. त्यानंतर मी सर्व भीषण परिस्थिती सांगितली असता. त्यांनी संपूर्ण नौदलच्या तुकड्या तैनात केल्या होत्या.


हेही वाचा: Bipin Rawat Helicopter Crash: शरद पवारांनी पायलटला दिलेल्या सल्ल्याने हेलिकॉप्टर अपघातातून बचावले होते, सांगितला किस्सा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -