घरमहाराष्ट्रMumbai Local : पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे डहाणू लोकल आज अंशत: रद्द

Mumbai Local : पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे डहाणू लोकल आज अंशत: रद्द

Subscribe

डहाणू रोड रेल्वे स्थानकात बुधवारी विशेष ट्र‌‌ॅफिक ब्लॉक घेण्यात येत आहे. सकाळी 8 वाजून 50 मिनिटांपासून ते 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

आठवड्याच्या मध्यावर म्हणजेच 16 ऑगस्ट बुधवारी पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. बुधवारी अनेक कार्यालयांना पारसी नूतन वर्षाची सुट्टी असली तरीही काही कार्यालयं मात्र इथं अपवाद ठरत आहेत. अशा सर्व मंडळींना सुट्टी नसल्याचा मनस्ताप होत असतानाच त्यात आणखी भर पडली आहे ती म्हणजे प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेची.( Mumbai Local Dahanu Local partially canceled today due to block on Western Railway )

डहाणू रोड रेल्वे स्थानकात बुधवारी विशेष ट्र‌‌ॅफिक ब्लॉक घेण्यात येत आहे. सकाळी 8 वाजून 50 मिनिटांपासून ते 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे हाताशी जास्तीचा वेळ ठेवून निघालेलं उत्तम ठरणार आहे.

- Advertisement -

ब्लॉकमुळे गाडी क्रमांक 22956 भूज-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस 30 मिनिटे विलंबाने आणि गाडी क्रमांक 22930 वडोदरा-डहाणू रोड एक्स्प्रेस 45 मिनिटे विलंबाने धावणार आहे. चर्चगेट ते विरार आणि डहाणू रोड दरम्यान धावणाऱ्या काही लोकल फेऱ्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

  • सकाळी 7.51 ची अंधेरी-डहाणून रोड लोकल वाणगाव स्थानकापर्यंतच धावेल.
  • सकाळी 9.37 ची डहाणू रोड- अंधेरी लोकल वाणगाव ते विरार दरम्यान धावणार आहे.
  • सकाळी 7.42 ची चर्चगेट-डहाणू रोड लोकल वाणगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येईल.
  • सकाळी 10.10 ची डहाणू रोड- विरार लोकल वाणगाव ते विरार दरम्यान धावणार आहे.
  • सकाळी 8.49 चर्चेगट- डहाणू रोड लोकल वाणगाव स्थानकापर्यंत धावेल.
  • सकाळी 11.35 डहाणू रोड ते विरार लोकल वाणगाव ते विरार दरम्यान धावणार आहे.

14-15 ऑगस्ट दरम्यान मेगा ब्लॉक

जळगाव-मनमाड दरम्यान तिसरी लाइन आणि यार्ड रिमॉडेलिंगचे काम केले जाणार होत. यासाठी 14 ते 15 ऑगस्टला मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. मेगा ब्लॉकमुळे मनमाडमार्गे मुंबई, नांदेड, पुणे या मार्गांवर धावणार्‍या 33 गाड्या रद्द करण्यात आल्या तर 19 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली होती.

- Advertisement -

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये उत्तर भारतातून मुंबईकडे येणार्‍या, जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मनमाड, जळगाव दरम्यान तिसरा रेल्वे रूळ टाकण्याचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे या कामासाठी तसेच रिमॉडेलिंगच्या कामाकरिता 14 आणि 15 ऑगस्ट असे दोन दिवस मेगा ब्लॉक ठेवण्यात आला होता.

( हेही वाचा: मी पुन्हा येईन! 2024 मध्ये पंतप्रधान होणार असल्याचा मोदींना विश्वास )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -