घरक्राइमपुण्यात दहशतवाद फोफावतोय? 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या दोघांना अटक

पुण्यात दहशतवाद फोफावतोय? ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या दोघांना अटक

Subscribe

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून दहशतवादाशी संबंधित असणारी प्रकरणे समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुण्यात दहशतवाद फोफावत आहे का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून दहशतवादाशी संबंधित असणारी प्रकरणे समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुण्यात दहशतवाद फोफावत आहे का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवारी (ता. 14 ऑगस्ट) ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ज्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ दोघांना अटक केली आहे. ज्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ते दोघेही सुरक्षारक्षक असल्याचे सांगण्यात आले आहे. (Two arrested for raising Pakistan Zindabad slogans in Pune)

हेही वाचा – Mumbai Local : पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे डहाणू लोकल आज अंशत: रद्द

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा येथे असलेल्या लक्ष्मीनगर परिसरामध्ये एका शाळेचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी काम करणारे दोन सुरक्षारक्षक हे सोमवारी संध्याकाळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत होते. तेव्हा त्या ठिकाणाहून जाणाऱ्या काही नागरिकांच्या कानावर या घोषणा पडल्या. त्या नागरिकांनी तत्काळ याबाबतची माहिती कोंढवा पोलिसांना दिली. पोलिसांनी सुद्धा घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्या ठिकाणी जाऊन घोषणा देणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. यानंतर या दोघांवरही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी याच परिसरातून राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि राष्ट्रीय तपास यंत्रणने काही जणांना ताब्यात घेतले होते. इसिस या दहशतवादी संघटनेच्या विचारधारेचा प्रसार करणारे हे तरूण होते, त्यांच्याकडून देशभरात दहशतवादी कारवाई करण्यात येणार होती, अशी माहिती तपासातून उघड झाली होती. परंतु गेल्या काही दिवसांत पुण्यातून दहशतवादाशी संबंधित काही घटना समोर आल्याने आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू लागले आहे.

- Advertisement -

पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पण याच विद्येच्या माहेरघरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असल्याने आता हे शहर गुन्हेगारीचे केंद्रबिंदू देखील बनत चालले आहे. तर दहशतवादसंबंधित कारवाई देखील या शहरात वाढत असल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क होऊ लागल्या आहेत. परंतु पुण्यात स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -