घरमहाराष्ट्रशामीबाबतच्या टिप्पणीनंतर पोलिसांच्या मजेशीर ट्वीटची जोरदार चर्चा; 'हे' भन्नाट रिप्लाय माहितीयत का?

शामीबाबतच्या टिप्पणीनंतर पोलिसांच्या मजेशीर ट्वीटची जोरदार चर्चा; ‘हे’ भन्नाट रिप्लाय माहितीयत का?

Subscribe

मुंबई पोलिसांची सोशल मीडिया टीम उत्तम काम करत असल्याचंच दिसून येत आहे. मुंबई पोलीस जे अनोखं ट्विट करतात त्यासाठी त्यांना दहापैकी दहा गुण मिळायला हवेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मुंबई पोलिसांचे ट्विट खूपच वेगळे आणि मनोरंजक असतात.

मुंबई: मुंबई पोलिसांचे मजेशीर ट्वीट अनेकदा आपण पाहिले आहेत. कोविड काळात मुंबई पोलिसांनी अनेक मजेशीर ट्वीट करत नागरिकांना महत्त्वाचे संदेश दिले होते. तसंच, चांद्रयान-2 च्या वेळीदेखील विक्रम लँडरने सिग्नल द्यावा यासाठी केलेलं ट्वीटही खूप चर्चेत आलं होतं. आता पुन्हा एकदा अशाच ट्वीटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मोहम्मद शामीने केलेल्या कालच्या ( 15 नोव्हबेंर) खेळीनंतर दिल्ली पोलीसांनी मुंबई पोलिसांना टॅग करत मजेशीर ट्वीट केलं त्याचं उत्तरही मुंबई पोलिसांनी अगदी त्याच अंदाजात दिलं आणि त्यानंतर मात्र मुंबई पोलिसांनी दिलेल्या काही मजेशीर उत्तरांची आठवण झाली. पोलिसांनी दिलेले Savage Reply पाहुया.. (Mumbai Police After Mohammed Shami tweet there was a lot of discussion about the funny tweet by the Mumbai Police here are some )

मुंबई पोलिसांची सोशल मीडिया टीम उत्तम काम करत असल्याचंच दिसून येत आहे. मुंबई पोलीस जे अनोखं ट्विट करतात त्यासाठी त्यांना दहापैकी दहा गुण मिळायला हवेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मुंबई पोलिसांचे ट्विट खूपच वेगळे आणि मनोरंजक असतात. मुंबई पोलिसांच्या सर्व ट्विटमध्ये नेहमीच नागरिकांसाठी एक संदेश असतो. तसंच काही ट्वीट हे जरा वेगळे आणि मजेदार असतात.

- Advertisement -

मुंबई पोलीसांनी दिल्ली पोलिसांनी केलेल्या ट्वीटला जशास तस उत्तर ट्वीट करत दिलं आहे. ट्विटमध्ये दिल्ली पोलिसांनी लिहिले की, “मुंबई पोलिसांनी आज रात्रीच्या हल्ल्यासाठी मोहम्मद शामीवर कोणताही गुन्हा दाखल न करण्याची अपेक्षा आहे.” त्यानंतर मुंबई पोलिसांनीही मजेशीर ट्वीट केलं आहे. मुंबई पोलिसांनी लिहिलं की, ‘दिल्ली पोलीस, तुम्ही असंख्य लोकांची मने चोरण्यासाठी कलम लावायला विसरलात आणि सहआरोपींची यादीही दिली नाही.’ अशी ही पहिलीच वेळी नाही की मुंबई पोलिसांनी मजेशीर ट्वीट केलं असेल. याआधीही मुंबई पोलिसांनी काही गंमतीदार आणि लक्षात राहतील असे ट्वीट केले आहेत.

गर्लफेन्डला भेटण्यासाठी कोणतं स्टिकर लावू?

लॉकडाऊनच्या काळात शहरात प्रवास करायचा असेल तर कामाच्या स्वरूपानुसार गाड्यांवर विविध रंगांचे स्टिकर लावण्याचं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं होतं. स्टिकरच्या रंगांबाबत लोकांमध्ये गोंधळ असल्यानं याबाबतचे अनेक प्रश्न मुंबई पोलिसांना विचारलं जात होते. त्यातील काही प्रश्न गंमतीशीरसुद्धा होते. ट्विटरच्या माध्यमातून असाच एक विचित्र प्रश्न विचारणाऱ्या मुंबईकरास पोलिसांनी तितकंच जबरदस्त उत्तर दिलं होतं. जे सोशल मीडियात व्हायरल झालं होतं.

- Advertisement -

एका तरुणानं मुंबई पोलिसांना मैत्रिणीला भेटण्याबद्दल प्रश्न विचारला होता. ‘मला मैत्रिणीला भेटायला जायचं आहे. त्यासाठी माझ्या वाहनावर कोणत्या रंगाचं स्टिकर लावावं लागेल,’ अशी विचारणा त्यानं केली होती. मुंबई पोलिसांनी या प्रश्नाला तितकंच मजेदार उत्तर दिलं होतं. गर्लफेन्डला भेटणं तुझ्यासाठी अत्यावश्यक आहे हे आम्ही समजू शकतो. मात्र, दुर्दैवानं ही गोष्ट आमच्याकडील अत्यावश्यक सेवांच्या यादीत मोडत नाही,’ असं पोलिसांच्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. तसंच, मुंबई पोलिसांनी संबंधित तरुणाला महत्त्वाचा संदेशही दिला होता. ‘अंतर राखल्यानं प्रेम वाढतं आणि सध्याच्या काळात तुमच्या आरोग्यासाठीही ते चांगलं आहे. हा केवळ एक टप्पा आहे. आपण संपूर्ण आयुष्य एकत्र घालवावं ही सदिच्छा,’ असं ट्वीट पोलिसांनी केलं होतं, ज्याने सोशल मीडियावर कहर केला होता.

विक्रम कुठेयस? चालान फाडणार नाही

इस्रोच्या चांद्रयान -2 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्रावर कधी उतरेल याची उत्सुकता देशवासियांमध्ये होती. पण अवघ्या 2.1 किलोमीटरवर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि अवघा देश शोकसागरात बुडाला होता. पण त्यानंतर विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आणि पुन्हा आनंदाला उधाण आलं होतं. त्याचवेळी नागपूर पोलिसांनी विक्रम लँडरबाबत एक ट्विट केलं आणि देशवासीय आनंदून गेले होते.

‘प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद दे. तू सिग्नल तोडलंस तरी आम्ही चलान फाडणार नाही,’ असं ट्विट नागपूर शहर पोलिसांनी केलं. पोलिसांच्या सेन्स ऑफ ह्यूमरचं त्यावेळी सोशल मीडियावर प्रचंड कौतुक करण्यात आलं होतं.

मुंबई पोलिसांचं आणखी एक मजेशीर उत्तर 

2021 ला 31 डिसेंबरच्या रात्री संचारबंदी लागू करण्यात आली होती. यादरम्यान एकाने मजेशीर पोस्ट करुन ती मुंबई पोलिसांना ट‌ॅग करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

त्याने लिहिलं होतं की रात्री 11 वाजता मी गर्लफेन्डच्या घरी पोहोचलो आणि रात्रभर तिथे राहिलो तर? त्यानंतर मुंबई पोलिसांनी जे उत्तर दिलं त्याला तोडचं नव्हती. पोलिसांनी ट्वीट करत त्याला उत्तर दिलं होतं की, आम्ही आशा करतो की तुम्ही तिची संमती घेतली असेल अन्यथा आमच्याकडे तुमच्यासाठी रात्रीसाठी पर्यायी निवास व्यवस्था आहे! त्यांच्या या हजरजबाबीपणावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.

मी माझं ‘समाधान’ गमावलं आहे, मुलीच्या पोस्टला पोलिसांचं भन्नाट उत्तर

मुंबई पोलीस लोकांना जागरूक करण्यासाठी मीम्स, व्हिडिओ आणि क्लिप्स शेअर करत असतात. 1 नोव्हेंबरला (2023) एका तरुणीने पोलिसांना टॅग करत माझं ‘समाधान’ हरवलं असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मात्र पोलिसांनी ज्या स्टाईलने उत्तर दिलं त्याची सर्वत्र चर्चा झाली होती.

पोलीस स्टेशन जा रही हूँ, मेरा सुकून खो गया है, असं ट्वीट वेदिका आर्या या तरुणीनं केलं होतं. यावर रिप्लाय करत मुंबई पोलीसांनी चित्रपटांची नावं घेत भन्नाट उत्तर दिलं, पोलिसांनी ट्वीट केलं की, मिस आर्या हम में से बहुत से लोग ‘सुकून’ की तलाश में हैं। हम हमारे ऊपर आपके ‘ऐतबार’ की सराहना करते हैं। हमें यकीन है कि ये आपको आपकी ‘रूह’ में मिलेगा। और कोई भी परेशानी हो तो ‘बेशक’ हमारे पास आइये।#EnsuringSukoonForMumbai #MumbaiFirst

(हेही वाचा: शामीच्या ‘त्या’ गुन्ह्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलं ट्वीट; मुंबई पोलिसांनीही दिलं सडेतोड उत्तर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -