घरमहाराष्ट्रMumbai Rains : कहां से आते है ऐसे लोग? सचिन सावंत यांचा...

Mumbai Rains : कहां से आते है ऐसे लोग? सचिन सावंत यांचा आशिष शेलार यांना टोला

Subscribe

मुंबई : मुंबईत शनिवारी आणि रविवार दुपारपर्यंत पावसाने (Mumbai Rains) धुमाकूळ घातला. त्यामुळे मुंबईतील सखल भाग जलमय झाले होते. त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तर, भाजपा आमदार आशिष शेलार यांनी याचा ठपका ठाकरे गटावर ठेवला आहे. त्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -

पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेतर्फे नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांची पाहाणी केली होती. त्यांच्याबरोबरीने भाजपाकडूनही या कामाची पाहाणी करताना, पालिकेला वेळोवेळी सूचना केल्या होत्या. तरीही पहिल्याच पावसात मुंबईतील सखल भागात पाणी साचले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. याबाबत, मुख्यमंत्री शिंदे यांनी, पाऊस आल्याचे स्वागत करा, मुंबईत पाणी तुंबल्याची तक्रार काय करता? अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. हे निर्लज्जपणाचे, नाकर्तेपणाचे आणि भ्रष्टाचारचे वक्तव्य असल्याची टीका त्यांनी केली.

हेही वाचा – मातोश्रीबाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात…, आशिष शेलार यांची आदित्य ठाकरेंवर टीका

- Advertisement -

तर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी याचे खापर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर फोडले आहे. हा पक्ष तसेच या पक्षाचे पाळीव कंत्राटदार हा जो एक ‘परिवार’ तयार झालाय, तोच मुंबईकरांचा खरा गुन्हेगार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जेव्हा मुंबईत नालेसफाई सुरू होती, भाजपाने उन्हातान्हात उतरून पहाणी केली आणि नालेसफाईची कामे असमाधानकारक झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते, असा दावाही त्यांनी केला. त्यावर काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी, कहां से आते है ऐसे लोग?, असे एका ओळीचे ट्वीट करून आशिष शेलार यांना टोला लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -