घरताज्या घडामोडीमुंबईतील गोवंडीच्या शासकीय वसतिगृहातून 6 मुली बेपत्ता

मुंबईतील गोवंडीच्या शासकीय वसतिगृहातून 6 मुली बेपत्ता

Subscribe

शासकीय मुलींच्या वसतिगृहातून शौचालयाचे खिडकी व ग्रील तोडून सहा अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या गोवंडी परिसरात ही घटना घडली आहे. ही घटना 11 सप्टेंबर रविवारी सकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली.

शासकीय मुलींच्या वसतिगृहातून शौचालयाचे खिडकी व ग्रील तोडून सहा अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या गोवंडी परिसरात ही घटना घडली आहे. ही घटना 11 सप्टेंबर रविवारी सकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. पळून जाण्यापूर्वी मुलींनी हवालदाराच्या खोलीचे गेट बाहेरून लॉक केले, जेणेकरून हवालदाराला सुगावा लागल्यावर त्यांचा पाठलाग होऊ नये. मात्र, मुली पळाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली. (mumbai six girls absconding from minor rehabilitation center of govandi)

पळून गेलेल्या सहाही मुली अल्पवयीन असून त्यांची ओळख पटली असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, याप्रकरणी गोवंडी पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी मुलगी पळून गेल्याची बातमी समजताच एकच खळबळ उडाली. घाईघाईत रजिस्टर बाहेर काढले आणि इथे कोण आहे आणि कोण फरार आहे याची तपासणी सुरू झाली. सर्व नोंदी घेतल्यावर 6 मुली बेपत्ता असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांची ओळख पटवण्यात आली. बेपत्ता विद्यार्थिनींची माहिती मिळताच वसतिगृह व्यवस्थापनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली.

सध्यस्थिती गोवंडी पोलीस आता बेपत्ता मुलींचा शोध घेत आहेत. मानवी तस्करी, भीक मागणे अशा बेकायदेशीर गोष्टी करणाऱ्यांवर वेगवेगळ्या तपास यंत्रणा कारवाई करतात आणि तिथे सापडलेल्या अल्पवयीन मुलींची सुटका केली जाते. तेथून सुटका करण्यात आलेल्या विद्यार्थिनींना गोवंडीच्या या वसतिगृहात ठेवले जाते.

- Advertisement -

या मुलींच्या शोधासाठी पोलीस वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत जेणे करून कोण बरोबर आणि कोण चूक हे कळू शकेल. तसेच,आम्ही त्या मुलींची ओळख पटवली असून आता त्यांची सुटका केल्याच्या ठिकाणाचा तपास करत आहोत. याशिवाय त्याच्याशी संबंधित कोणी आढळून आल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – कसं काय पाटील बरं हाय ना, काल दिल्लीत काय झालं ते खरं हाय ना? मुख्यमंत्र्यांची जयंत पाटलांवर टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -