घरताज्या घडामोडी... अन्यथा निवडणुकीत तुमच्यावर बहिष्कार टाकू, व्यापारी संघटनांचा ठाकरे सरकारला इशारा

… अन्यथा निवडणुकीत तुमच्यावर बहिष्कार टाकू, व्यापारी संघटनांचा ठाकरे सरकारला इशारा

Subscribe

दुकानांवरील निर्बंद उठले नाहीतर सत्ताधाऱ्यांवर बहिष्कार टाकू असा इशारा मुबईतील दुकानदार संघटनेने दिला

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाला नाही आहे. मुंबई कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असल्यामुळे दुकानदार संघटनेत ठाकरे सरकारविरोधात रोष निर्माण झाला आहे. मुबंईतील रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे दुकानांना वेळा ठरवून देण्यात आल्यात परंतु या वेळा मान्य नसल्यामुळे अनेक दुकानदारांनी दुकानं बंदच ठेवली आहे. तसेच दुकानांवरील निर्बंद उठले नाहीतर सत्ताधाऱ्यांवर बहिष्कार टाकू असा इशारा मुबईतील दुकानदार संघटनेने दिला आहे.

मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला यश आलं आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने मुंबईचा समावेश पहिल्या अन्यथा दुसऱ्या टप्प्यात करण्यात यावा अशी मागणी फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी केली आहे. मागील महिन्यापासून मुंबईत कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. रुग्णसंख्या कमी झाली आहे परंतु राज्य सरकार मुंबईला पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यत न टाकता तिसऱ्याच टप्प्यात ठेवले आहे. राज्य सरकार अजून कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्याची वाट पाहत आहे असे न करता दुकानांवरील निर्बंध उठवण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

दुकानदारांची मागणी काय?

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्यामुळे प्रशासनानं मुंबईला पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात टाकल्यास दुकाने दिवसभर सुरु ठेवता येतील. परंतु मुंबईतील कोरोना परिस्थिती अजून आटोक्यात येण्याची वाट राज्य सरकार पाहत आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध असल्यामुल दुकाने केवळ संध्याकाळी ४ पर्यंत ठेवण्याची परवानगी दिली आहे. परंतु ग्राहकांना संध्याकाळी खरेदीला येण्याची सवय असल्यामुळे नागरिक दुपारी बाहेर पडत नाहीत. तसेच विकेंडला खरेदी करण्यासाठी ग्राहक येतात परंतु अत्यावश्यक दुकानांना परवानगी असल्यामुळे विनाअत्यावश्यक सेवेतील दुकानांना मोठं नुकसान होत आहे.

दुकानदारांना खर्च परवडत नसल्यामुळे अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. विदेशातून हजारो पर्यटक रोज मुंबईत येत असल्यामुळे मुंबईतील कोरोना परिस्थिती लवकर आटोक्यात येणं अशक्य आहे. यामुळे राज्य सरकारने दुकानदारांना पुर्णवेळ दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी फेडरेशनने केली आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर उत्पन्नात बुडालेले व्यापारी लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दुकानदार फेडरेशनने दिला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -