घरमहाराष्ट्रकोल्हापूर हत्याकांड; सासू ,मेव्हणीवर जावयाचा वार

कोल्हापूर हत्याकांड; सासू ,मेव्हणीवर जावयाचा वार

Subscribe

हत्याकांडातील मुख्य आरोपी प्रदीप जगताप या घटनेनंतर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

कोल्हापूरच्या यड्राव गावामध्ये कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याची घटना समोर आली आहे. जावयाने आपल्या सासूवर आणि मेहुणीवर हल्ला करत त्यांना ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छाया धुमाळ आणि सोनाली रावण (सासू-मेहुणी) अशी मृत पावलेल्या माहिलांची नावं आहेत. याशिवाय या हल्ल्यात मारेकऱ्याती पत्नी रुपाली धुमाळ-जगताप आणि मेहुणा रोहित धुमाळ हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या हत्याकांडातील आरोपी प्रदीप जगताप हा सांगलीच्या कवठे गुलंद गावचा रहिवासी आहे.  धुमाळ यांची मुलगी रुपाली हिच्याशी प्रदीपचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. शनिवारी (आज) सकाळी प्रदीप आपल्या सासपी यड्रावला आला होता. कुणाला काही कळायच्या आतच त्याने धुमाळ कुटुंबियांवर अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका तीव्र होता की त्यामध्ये प्रदीपची सासू आणि मेहुणी जागीच ठार झाले तर पत्नी आणि मेहुणा गंभीर जखमी झाले. सध्या जखमींवर सांगलीच्या सिव्हील रुग्णालयातील ICU वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत.

पुणे होर्डिंग दुर्घटना: दोन जणांना अटक

प्राथमिक तपासानंतर स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी प्रदीपने यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने धुमाळ कुटुंबियांवर हल्ला केला. सध्या पोलीस या हत्याकांडामागील नेमकं कारण काय? याचा तपास करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे स्थानिकांमध्ये घबराटीते वातारण पसरले आहे. दरम्यान मुख्य आरोपी प्रदीप जगताप या घटनेनंतर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


वाचा: पोलीस बनले ‘वसुली एजंट’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -