घरदेश-विदेशकेरळमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

केरळमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

Subscribe

हवामान विभागाकडून केरळमध्ये पुन्हा अतिवृष्टी इशारा देण्यात आला आहे. यावेळी अतिवृष्टीचा फटका कर्नाटक राज्यालाही बसू शकतो.

काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीने होरपळून निघालेल्या केरळे राज्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता हळूहळू ते पुर्वपदावर येत होते. परंतु, आता पुन्हा केरळ राज्यावर संकटांचे काळे ढग दाटू लागले आहेत. हवामान विभागाने केरळमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यावेळी या अतिवृष्टीचा फटका कर्नाटक राज्यालाही होऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे केरळच्या पाच राज्यांमध्ये यल्लो अलर्ट जारी करण्यात आले आहे. सध्या कर्नाटकच्या काही भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु, वातावरणातील बदलांमुळे कर्नाटकाला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आतापर्यत २२ धरणांचे दरवाजे उघडले गेले

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे केरळच्या पाच राज्यांमध्ये यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आतापर्यत राज्यातील २२ धरणांचे दरवाजे उघडले गेले आहेत. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास इडुक्की धरणाचा दरवाजा उघडण्यात येणार आहे.

- Advertisement -

अतिवृष्टीमागे काय आहे कारण?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लक्षद्वीप आणि मालदीव बेटावर सुरु असलेल्या चक्रीवादळांमुळे अरबी समुद्राच्या अग्णेय दिशेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे केरळच्या काही भागांमध्ये मुसळदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मासेमाऱ्यांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा

अरबी समुद्रात अग्णेय दिशेत कमी दाबाचा पट्यामुळे शनिवारी आणि रविवारी मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर शनिवारी समुद्राचे वातावरण जास्त खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनाही हवामान विभागाने समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा इशारा केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -