घरक्राइम'खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीचा खून' जामिनावर बाहेर येताच आरोपीचा काढला काटा

‘खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीचा खून’ जामिनावर बाहेर येताच आरोपीचा काढला काटा

Subscribe

नाशिक : शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारीने उच्छाद मांडला आहे. सातत्याने अवैध धंदे, दरोडे, चोरी, जीवघेणे हल्ले, खून अशा घटना सातत्याने घडत आहेत. पोलिसांकडून विविध उपक्रम राबवले जात असूनही गुन्हेगारी कमी होतं दिसत नाहीये. दरम्यान, दिंडोरी तालुक्यात ‘खून का बदला खून’ अश्या स्वरूपाची थरारक घटना घडली आहे. दिंडोरी तालुक्यातील कोचरगावातील फोकळवाडे शिवारात ठाकरे यांच्या शेतात एका युवकाची हत्या करण्यात आली आहे.

2020 साली झालेल्या एका खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने फोकळवाडे शिवारात युवकाचा खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सागर भगवान लिलके या 25 वर्षीय युवकाचा निर्घुण खून करण्यात आला आहे. खून झालेला सागर आणि त्याच्या भावाने काही साथीदारांच्या मदतीने सुखदेव नारायण पारधी यांचा मुलगा शिवाजी पारधी याचा 2020 साली निर्घुण खून केला होता. त्याचा रंग शिवाजी पारधी यांच्या नातेवाईकांच्या डोक्यात मागील 3 वर्षापासूनच होता. दरम्यान, सागर लिलके हा खुनाच्या आरोपातून जामिनावर नुकताच बाहेर आला होता. सागर जामिनावर बाहेर येताच 2020 साली खून झालेल्या शिवाजी पारधीच्या नातेवाईकांच्या मनात असलेल्या रागातून आपल्या मुलाचा बदला घेण्याचा विचार आला. त्यातून त्यांनी सागरला संपवण्याचा कट रचला.

- Advertisement -

बुधवारी (दि. 9) सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान सागर लिलके फोकळवाडे शिवारात आला असता. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या शिवाजी पारधी याच्या नातेवाइकांनी त्याच्यावर हल्ला चढवला. ‘याला जिवंत सोडू नका, मारून टाका’ असे म्हणत त्याच्या डोक्यात कोयता घातला त्यानंतर चॉपरने वार करून इतरही हत्यारांच्या सहाय्याने त्याचा निर्घुण खून केला. दरम्यान या प्रकरणी समाधान प्रभाकर टोंगारे, दगू पारधी, संजय लालू लिलके, योगेश लालू लिलके, चंद्रकांत कचरू पारधी, राजेंद्र रामदास पारधी, शिवाजी महादू लिलके, वाळू मुरलीधर लिलके, साजन मुरलीधर लिलके, मोहन मुरलीधर लिलके, सुनील प्रकाश डोंगरे, लहानु काशिनाथ टोंगारे, संभाजी सुखदेव पारधी, सुखदेव नारायण पारधी, अजय रामदास पारधी, मुरलीधर चिमणा लिलके, सोमनाथ कचरू पारधी, निवृत्ती लालू लिलके, प्रभाकर वामन टोंगारे, कचरू पारधी व सुरेश पांडुरंग लिलके यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कविता फडतरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मोनिका जेजोट या करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -