घरमहाराष्ट्रपुन्हा नागपूर हादरले: वकीलानेच केली वकिलाची हत्या

पुन्हा नागपूर हादरले: वकीलानेच केली वकिलाची हत्या

Subscribe

लोकेशने सदानंद नारनवरे यांची हत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणाचा नागपूर पोलीस तपास करत आहे.

नागपूर जिल्ह्यामध्ये वारंवार गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे कायदा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकादा उपस्थित केला जात आहे. आज तर चक्क एका वकिलाने वकिलावरच प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर जिल्हा न्यायालयासमोर ज्येष्ठ वकील सदानंद नारनवरे यांच्यावर एका वकीलानेच कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर हल्लेखोर वकिलाने विष प्राशन केले. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सदानंद नारनवरे आणि हल्लेखोर वकीलचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नागपूर शहर हादरले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लग्नाला न विचारता गेली म्हणून वडिलांनीच केली मुलीची हत्या


दोघांचाही उपचारापूर्वी मृत्यू

आज नागपूर जिल्हा न्यायालयासमोरील करोडपती गल्लीत ४.३० वाजता आरोपी वकील लोकेश भास्कर याने वकील सदानंद नारनवरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. लोकेशने मागून येऊन कुऱ्हाडीने सदानंद यांच्या मान आणि डोक्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात सदानंद गंभीर जखमी झाले. हल्ला केल्यानंतर आरोपी लोकेशने विष प्राशन केले. दोघांना देखील घटनास्थळी उपस्थिती असलेल्या वकीलांना ताबडतोब मेयो रुग्णालयात उपाचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषीत केले.

- Advertisement -

हेही वाचा – आठ महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य । प्रेयसीने केली होती हत्या


का केली हत्या याचा तपास सुरु

अॅड. सदानंद नारनवरे हे नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागाचे निवृत्त प्राध्यापक होते. तर आरोपी लोकेश भास्कर हा देखील पेशाने वकीलच होता. लोकेश मुळचा भंडाऱ्याचा आहे त्याने नुकताच वकिलीची सनद मिळवली होती. सध्या तो सदानंद नारनवरे यांच्याकडे प्रॅक्टिससाठी नागपुरात येत होता. लोकेशने सदानंद यांची हत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणाचा नागपूर पोलीस तपास करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -