घरताज्या घडामोडीकिरीट सोमय्यांना नागपूर सत्र न्यायालयाकडून समन्स, अतुल लोंढे यांनी दाखल केली याचिका

किरीट सोमय्यांना नागपूर सत्र न्यायालयाकडून समन्स, अतुल लोंढे यांनी दाखल केली याचिका

Subscribe

२० नोव्हेंबर रोजी सत्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात नागपूर सत्र न्यायालयात मानहानीचा आरोप करत दिवाणी आणि फौजदारी याचिका दाखल केली आहे. नागपूर सत्र न्यायालयाकडून किरीट सोमय्या यांना समन्स बजावण्यात आले असून २० नोव्हेंबर रोजी सत्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. किरीट सोमय्या यांनी स्वत: किंवा त्यांच्या वकिलांनी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर रहावे असे न्यायालयाने म्हटले आहे. अतुल लोंढे यांनी वकील सतीश उके यांच्यामार्फत ही दिवाणी आणि फौजदारी याचिका दाखल केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असल्याने आता अतुल लोंढे यांनी सोमय्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

- Advertisement -

अतुल लोंढे यांनी सोमय्या यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेत, किरीट सोमय्या यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नसताना ते आरोपांची राळ उडवून महाविकास आघाडी सरकारची बदनामी करत असतात. अनेकदा टीका करताना सोमय्यांचा तोल जातो. किरीट सोमय्या स्वत:ला तपास अधिकारी आणि न्यायधीश असल्याच्या आवेशात बोलतात. त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसतात. काँग्रेसची बदनामी केल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी आणि मानहानी केल्याप्रकरणी त्यांना १ रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

किरीट सोमय्या यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीकडून वसुली केली जाते. या वसुलीतून येणाऱ्या पैशांचे वाटे होतात त्यातील ४० टक्के वाटा शिवसेनेचा असतो तर ४० टक्के वाटा राष्ट्रवादी काँग्रेस आणि २० टक्के वाटा काँग्रेसचा असतो अरोप केला होता. किरीट सोमय्यांनी कोणत्याही पुराव्यांशिवाय केलेले हे आरोप खोटे आहेत आणि सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारची बदनामी केली आहे त्यामुळे याची भरपाई म्हणून १ रुपये दंड वसूल करावा असे याचिकेत म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -