घरताज्या घडामोडीकाँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Subscribe

आमदार जितेश अंतापूरकर शपथबद्ध

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांना बुधवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली.

झिरवाळ यांच्या दालनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार नाना पटोले, आमदार अमर राजूरकर, आमदार विक्रम काळे, विधीमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

- Advertisement -

२ नोव्हेंबरला नांदेडमधील देगलूर बिलोली येथे विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत ६४.९५ टक्के इतके मतदान करण्यात आले होते. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा मोठ्या मताने विजय झाला आहे. या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. परंतु ही निवडणूक प्रामुख्याने ३ पक्षात झाली होती. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.

विजय झाल्यानंतर जितेश अंतापूरकर यांची पहिली प्रतिक्रिया…

विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. माझा विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला जनतेने भरभरून प्रेम दिले, त्यामुळे मी निवडून येऊ शकलो. असे जितेश अंतापूरकर म्हणाले होते.

- Advertisement -

विकासाच्या विचाराला जनतेनं साथ दिली : अशोक चव्हाण

हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात काँग्रेसनं जागा राखल्या आहेत. हा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा संयुक्त विजय आहे. पालकमंत्री या नात्यानं मी विकासासाठी प्रयत्नशील राहीन. हा विजय काँग्रेसचा असून महाविकास आघाडीचा देखील आहे. विकासाच्या विचाराला जनतेनं साथ दिली आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले होते.

दरम्यान, काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा ४१ हजार ९३३ मतांनी विजय झाला होता. तर भाजपामधून सुभाष साबणे यांचा ६६ हजार ९०७ मतांनी विजय झाला.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -