घरताज्या घडामोडीनारायण राणे गैरहजर; वकिलांनी सांगितले कारण..

नारायण राणे गैरहजर; वकिलांनी सांगितले कारण..

Subscribe

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात वादग्रस्त विधान केल्यामुळे रायगड पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. नारायण राणेंना जमीन देण्यात आला असला तरी रागयगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र नारायण राणे रायगड पोलिसांसमोर हजर झाले नाही परंतु त्यांचे वकिल संदेश चिकणे पोलिसांसमोर हजर राहिले होते. नारायण राणेंना बरे वाटत नसल्यामुळे पोलिसांसमोर हजर राहू शकले नाही असे कारण वकिल संदेश चिकणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणेंना न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत अंतरिम कारवाईमध्ये दिलासा दिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात वादग्रस्त विधान केल्यामुळे रायगड पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले होते. नारायण राणे पोलिसांसमोर हजर राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. राणे पोलीस स्थानकात येणार यामुळे कार्यालयाभोवती मोठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र नारायण राणें पोलिसांसमोर हजर राहिले नाही. राणेंच्या ऐवजी त्यांचे वकिल संदेश चिकणे पोलीस स्थानकात आले होते.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी राणे रायग पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावणार होते. मात्र राणेंचे वकिल संदेश चिकणे आणि भाजपचे स्थानिक नेते पोलिसांसमोर हजर झाले होते. नारायण राणे यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाही असे वकिल संदेश चिकणे यांनी म्हटलं आहे. न्यायालयाने नारायण राणेंना १५ हजार रुपयांचा दंड आकारुन जामीन मंजूर केला होता. राणेंना रायगड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश नारायण राणेंना दिले होते.


हेही वाचा :  सगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही दिवस येतील – संजय राऊत

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -