घरदेश-विदेशजर्मनीत एकाचवेळी नाशिकचे सहा ‘आयर्न मॅन’

जर्मनीत एकाचवेळी नाशिकचे सहा ‘आयर्न मॅन’

Subscribe

नाशिकच्या एका महिलेने पटकावला देशातील फास्टेस्ट इंडियन लेडी आयर्नमनचा किताब, नाशिकमध्ये आतापर्यंत १४ आयर्नमन

अत्यंत खडतर परिस्थिती शारीरिक क्षमतांचा कस पाहणारी ‘आयर्न मॅन’ स्पर्धा जर्मनीतील येथील हमबर्ग येथे पार पडली. त्यात सहा नाशिककरांनी यशस्वीपणे ही स्पर्धा पूर्ण केली. विशेष म्हणजे यात नाशिकच्या एका महिलेने उल्लेखनीय साहस करत देशातील फास्टेस्ट इंडियन लेडी आयर्नमनचा किताब पटकावला. एक-दोन नव्हे तर तब्बल सहा नाशिककरांनी अतिशय अवघड अशी ही स्पर्धा पार करून नाशिककरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात यश मिळवले.

नाशिकचे प्रख्यात डॉ. वैभव पाटील यांनी ही स्पर्धा १४ तास २६ मिनिटांत पूर्ण केली. तर, डॉ अरुण गचाले यांनी दुसऱ्यांदा आयर्नमनचा किताब पटकावला. त्यांना स्पर्धा पूर्ण करण्यासाठी १५ तास ३७ मिनिटे लागली. अरुण पालवे यांनी १५ तास ४ मिनिट, तर नीलेश झंवर यांनी सर्वप्रथम ११ तास ५९ मिनिटांत स्पर्धा पूर्ण केली. अनिकेत झंवर यांनी १४ तास ३५ मिनिटांत अंतर कापले. विशेष म्हणजे नाशिकच्या या टीममध्ये डॉ. देविका पाटील यांचाही सहभाग होता. त्यांनी १३ तास ३ मिनिटांच्या विक्रमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण करण्याचा बहुमान पटकावला. त्यामुळे डॉ. पाटील या फास्टेस्ट इंडियन लेडी आयर्नमन ठरल्या. याआधी हा विक्रम ब्लॉसम नामक महिलेच्या नावावर होता. नाशिकमधून तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची कन्या रविजा सिंगल यांच्यानंतर डॉ. देविका पाटील आयर्नमन ठरल्याने महिलांचा या साहसी स्पर्धेकडे कल वाढत असल्याचं दिसून येत आहे.

- Advertisement -

नाशिकच्या आयर्नमन यादीत डॉ. सुभाष पवार स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंगमध्ये मागे पडले. विशेष म्हणजे त्यांनी ६५ व्या वर्षी सहभाग नोंदवला होता. नाशिकसाठी ६५ वर्षांच्या व्यक्तीने या साहसी स्पर्धेत सहभाग घेणे हेदेखील विशेष आहे.
अशी होती स्पर्धा स्पर्धेचा कट ऑफ टाईम १५ तास ५० मिनिटे इतका होता. यामध्ये स्विमिंग ४ किलोमीटर, सायकलिंग १८० किलोमीटर, रनिंग ४२ किलोमीटर होते. हे सर्व स्पर्धकाला १५ तास ५० मिनिटात पूर्ण करावे लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -