घरमहाराष्ट्रदुसरा व्यक्ती असता तर मुख्यमंत्रिपदावर राहिला नसता, राणेंचा ठाकरेंवर घणाघात

दुसरा व्यक्ती असता तर मुख्यमंत्रिपदावर राहिला नसता, राणेंचा ठाकरेंवर घणाघात

Subscribe

वॉर्डचे अधिकारी येतात काय, नोटीस देतात काय अरे काय लावलंय काय. असू दे चांगल्या आठवणी मिळतायत आणि जबाबदारी आमची वाढतेय. स्वतःला वाघ म्हणणारे मांजरीच्या आवाजने असे का झाले, मला कळलं नाही. नितेश कलाकार बनतोय याचं समाधान आहे. त्याने मांजरीचा म्याव म्याव असा आवाज काढला. वाघ गेले आणि मांजर कधी आले कळले नाही, असा टोलाही राणेंनी लगावलाय.

मुंबईः भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. मी कोणाच्या आजारपणावर बोलणार नाही, दुसरा व्यक्ती असता तर पदावर राहिला नसता. राजीनामा दिला असता, आता उभं राहायला, पण दोन दोन माणसं लागतात. या महाराष्ट्रात अशी कोणावर पाळी आली नाही, असंही नारायण राणे म्हणालेत. असं राजकारण कधीच नव्हतं. हे सुडाचं राजकारण बंद करा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर लोक कल्याणकारी महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. ही दुष्ट बुद्धी संपवा, मराठी माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा देण्यासाठी काही तरी करा. मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाही, मुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाही, मुख्यमंत्री सभागृहात जात नाहीत. मुख्यमंत्री झालात हीच इतिहासात नोंद होईल, हेच यांचं काम आहे. हेच कर्तृत्व आहे. गुणवत्ता, पात्रता नसतानाही मी सव्वा दोन वर्ष काढली. ही बाळासाहेबांची पुण्याई आहे. एवढं सोडलं तर बाकी काही नाही, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. नारायण राणेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते.

साहेबांनी आम्हाला घडवलं, आमच्याकडे पाहिल्यानंतर त्यांना आनंद वाटायचा. साहेबांना चांगल्या गोष्टी पाहायला आणि ऐकायला आवडायच्या. तेच या लोकांना बोचरे बसतात. माझ्या आजूबाजूच्या इमारती आधी चेक करा, मुंबईत कायदेशीर काय, बेकायदेशीर काय हे पाहा आणि मग आमच्याकडे या. कमी जास्त असल्यास आम्ही इथे बसलोय. वॉर्डचे अधिकारी येतात काय, नोटीस देतात काय अरे काय लावलंय काय. असू दे चांगल्या आठवणी मिळतायत आणि जबाबदारी आमची वाढतेय. स्वतःला वाघ म्हणणारे मांजरीच्या आवाजने असे का झाले, मला कळलं नाही. नितेश कलाकार बनतोय याचं समाधान आहे. त्याने मांजरीचा म्याव म्याव असा आवाज काढला. वाघ गेले आणि मांजर कधी आले कळले नाही, असा टोलाही राणेंनी लगावलाय.

- Advertisement -

रमेश मोरेची हत्या कोणी केली, का केली. त्याची कोणाशी दुश्मनीच नव्हती. जयंत जाधव बिचारा कोणाच्यात नाही. तो व्यवसायिक, त्याची का हत्या झाली आम्हाला काय माहीत नाही. कोणी असं समजू नये. स्वतः मुख्यमंत्री वॉर्डमध्ये जातात, फोन करतात. कसली दुश्मनी, मी शरण येणाऱ्यांपैकी नाही. मी मराठा असल्याचं मला सांगावासं वाटतं. आमचे मार्गदर्शक आणि दैवत इथे आहेत, आम्हाला राजकारण कोणी शिकवू नये. आम्ही कोणाच्या पोटावर मारलं नाही, मारणार नाही. कोणाच्या घराची दुष्टबुद्धीने तक्रार करणार नाही. स्वतः बोलत नाही ते चिंपाट कोण खासदार बोललात, विकासाबद्दल ते बोलत नाहीत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे. दोन वर्षात दरडोई उत्पन्न किती वाढलं. मराठी माणसासाठी शिवसेना, मराठी माणूस उद्ध्वस्त झाला, मुंबईतून तडीपार झाला. 1966 साली मुंबईत मराठी माणूस किती होता आणि आज किती आहे. उद्योगधंदे आणि रोजगार दिला, तर नाही फक्त राजकारण केलं. सव्वादोन वर्षात शिवसेनेला काय मिळालं, मातोश्रीवरच्या चमच्यांना काय मिळालं याची आज नाही तर उद्या चर्चा होईल, असंही नारायण राणे म्हणालेत.


हेही वाचाः 

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -