घरमहाराष्ट्रनाशिकNarendra Modi : बाबा महाराज सातारकर हे देशाचं वैभव; पंतप्रधान मोदींनी शिर्डीतील...

Narendra Modi : बाबा महाराज सातारकर हे देशाचं वैभव; पंतप्रधान मोदींनी शिर्डीतील सभेत वाहिली श्रद्धांजली

Subscribe

शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (26 ऑक्टोबर) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. या दौऱ्यात मोदी 86 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ दिला. सोबतच निळवंडे धरणाचे जलपूजन करून राज्यात कालव्याचे जाळे पसरवले. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन झाले. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध कीर्तनकार-निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली. (Baba Maharaj Satarkar is the glory of the country PM Narendra Modi pays tribute at Shirdi meeting)

हेही वाचा – कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन, फर्निचरचा व्यवसाय सोडून केली अध्यात्मसेवा

- Advertisement -

नरेंद्र मोदी म्हणाले की, आज मी ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकरांच्या निधनाचं वृत्त ऐकलं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, अशी प्रार्थना मी करतो. बाबा महाराज सातारकर हे देशाचं वैभव होते. वारकरी संप्रदायाचा गौरव असलेले बाबा महाराज सातारकर आज वैकुंठवासी झाले. त्यांनी त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून जे जनजागृतीचं काम केलं ते येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे. बाबा महाराज सातारकर हे अत्यंत साधेपणाने आणि सरळ संवाद साधत असत. बाबा महाराज सातकरकर यांची वाणी आणि शैली लोकांचं मन जिंकत असे. त्यांच्या वाणीमध्ये कायमच जय जय रामकृष्ण हरी या भजनाचा प्रभाव आपण सगळ्यांनी पाहिला आहे. मी आज त्यांना श्रद्धांजली वाहतो, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा – गरीबांचा विकास हाच खरा समाजिक न्याय; निळवंडे धरणाचे जलपूजन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया

- Advertisement -

दरम्यान, प्रसिद्ध कीर्तनकार-निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांचे आज पहाटे सहा वाजता निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साध्या सोप्या भाषेत कीर्तन आणि निरुपण हे त्यांचे वैशिष्ट्य होते. बाबा महाराज सातारकर मागील काही दिवसांपासून आजारी होते. आठ महिन्यापूर्वीच सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर उर्फ माई सातारकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (27 ऑक्टोबर) सायंकाळी 5 वाजता नेरूळ येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -