घरक्राइमगॅस कटरने एटीएम फोडून २८ लाखांवर दरोडा; गूगल मॅपने शोधायचे एटीएम

गॅस कटरने एटीएम फोडून २८ लाखांवर दरोडा; गूगल मॅपने शोधायचे एटीएम

Subscribe

नाशिक : ग़ॅस कटरने एटीएम मशीन फोडून २८ लाख ३५ हजार ४०० रुपये लंपास करणार्‍या हरियाणातील सराईत गुन्हेगारास नाशिक ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केली. न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गुन्हेगाराने सिन्नर शहरातील अ‍ॅक्सिस बँक एटीएममध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे. गुन्हेगाराकडून महाराष्ट्रातील एटीएम चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी 10 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. इरशाद खान आस मोहम्मद खान (वय ३८, रा. हातीन, जि. पलवल, हरियाणा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत २६ ऑगस्ट २०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास चिंचखेड चौफुली परिसरातील आरोपींनी एचडीएफसी बँकेचे एटीएमचे शटर अर्धवट उघडून आत प्रवेश केला. आरोपींनी एटीएम मशीन मशिन गॅस कटरच्या सहाय्याने फोडले. त्यानंतर मशीनमधील तब्बल२८ लाख ३५ हजार ४०० रुपये लंपास केले. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घटनास्थळी भेट देवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या. त्याप्रमाणे गुन्हे शाखेने एटीएम चोरीच्या गुन्हयातील आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत व त्यांनी गुन्हा करताना वापरलेल्या वाहनाचा तपास करण्यासाठी जिल्हा सीमावर्ती भागांमध्ये तपास पथके रवाना केली होती. महाराष्ट्रातील विविध शहरांमधील एटीएम चोरीच्या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींची माहिती संकलित केली. त्यावरून आरोपी हरियाणा राज्यातील असल्याचे समोर आले.

दरम्यान, काही गुन्हेगार हे महाराष्ट्रातच असल्याची मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने नाशिक व अहमदनगर जिल्हयाचे सीमावर्ती भागात सापळा रचून एटीएम चोरीतील सराईत गुन्हेगार खान यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हरियाणातील इतर साथीदारांच्या मदतीने पिंपळगाव परिसरात एचडीएफसी बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. त्याने चोरीसाठी केटा कार व एक ट्रक वापरला असल्याचेही सांगितले.

- Advertisement -

आधी महामार्गालगतच्या एटीएमची रेकी मग करायचे चोरी

आंतरराज्य सराईत गुन्हेगार खान हा महामार्गांनजीकचे एटीएम मशीनची गूगल मॅपव्दारे माहिती काढायचा. त्यानंतर रेकी करून एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून रोख रक्कम लंपास करत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

आरोपीवर जनावरे चोरीचेही गुन्हे

सराईत गुन्हेगार इरशाद खान आस मोहम्मद खान हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अहमदनगर, लातूर, हिंगोली, औरंगाबाद जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील कसरावद, निमच या ठिकाणांवर एटीएम चोरी व जनावरे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -