घरमहाराष्ट्रपुणेवादग्रस्त विधानामुळे संभाजी भिंडेंविरोधात पुणे न्यायालयात दाखल होणार खटला

वादग्रस्त विधानामुळे संभाजी भिंडेंविरोधात पुणे न्यायालयात दाखल होणार खटला

Subscribe

वादग्रस्त विधानांमुळे संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे यांच्याविरोधात शुक्रवारी याचिका दाखल करण्यात येणार आहे. पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे.

वादग्रस्त विधानांमुळे संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे यांच्याविरोधात शुक्रवारी याचिका दाखल करण्यात येणार आहे. पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्यासह डॉक्टर कुमार सप्तर्षी, डॉक्टर विश्वमभर चौधरी, अन्वर राजन, मेधा पुरव सामंत, युवराज शाह, प्रशांत कोठडीया, संकेत मुनोत, जांबुवंत मनोहर हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. (Due to the controversial statement on Mahatma Gandhi a case will be filed against Sambhaji Bhinde in Pune court )

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. महात्मा गांधी, क्रांतज्योती महात्मा फुले आणि इतर अनेक राष्ट्रपुरूष , विचारवंत यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप संभाजी भिडे यांच्या विरोधात करण्यात आला आहे आणि त्यावरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भिडे यांच्याविरोधात नवीन पनवेल पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच, तसंच, अमरावतीतदेखील भिडे गुरूजींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतकचं काय देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती विधानसभेतही दिली होती.

- Advertisement -

भिडे गुरूजींचं वादग्रस्त वक्तव्य

अमरावतीच्या बडनेर येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी गांधींच्या वडिलांबाबत केलेलं विधान वादात सापडलं आहे. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लिम जमीनदाराचे पुत्र असल्याचे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होता. इतकंच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लिम पालकानं केल्याचा दावादेखील संभाजी भिडे यांनी केला. या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत भिडेंना अटक करण्याची मागणीही केली होती.

(हेही वाचा: पुणेकरांची आता वाहतूक कोंडीतून होणार सुटका; उभारणार 4 कोटींचा महामार्ग)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -