घरमहाराष्ट्रनाशिकपालिकेचा कारभार, अंत्यसंस्कारांसाठी ३ कोटींचा प्रस्ताव

पालिकेचा कारभार, अंत्यसंस्कारांसाठी ३ कोटींचा प्रस्ताव

Subscribe

पर्यावरण संरक्षणासाठी महापालिकेने विद्युत व डिझेल दाहिनीवर भर देणे अपेक्षित

 गेल्या चौदा महिन्यात कोरोनासह अन्य आजारांमुळे तब्बल २० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.याकडे अंगुलीनिर्देश करत महापालिकेच्या घनकचरा विभागाने तिसर्‍या लाटेत मृत्यूंचा हाच आकडा गृहीत धरला आहे. इतकेच नाही तर याच आकड्याच्या आधारे मोफत अंत्यसंस्कारासाठी तीन कोटींचा खर्चाचा प्रस्ताव पुढे केला आहे.पर्यावरण संरक्षणासाठी महापालिकेने विद्युत व डिझेल दाहिनीवर भर देणे अपेक्षित असताना, पुन्हा लाकडांवरील अंत्यसंस्कार योजनेला प्राधान्य दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

१७ स्मशानभूमींमध्ये दर महिन्याला ६०० ते ८०० मृतदेहांवर महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यसंस्कार केले जातात. प्रत्येक मृतदेहासाठी आठ मण लाकूड, पाच लिटर रॉकेल आणि एक मडके, तसेच गोवर्‍या दिल्या जातात. त्यासाठी पालिकेकडून ठेकेदाराला मोबदला मिळतो. एप्रिल ते मार्च कालावधीसाठी हा ठेका असतो. परंतु, कोरोनामुळे दीड वर्षातच महापालिकेने केलेली तरतूद संपुष्टात आली आहे.ठेक्याची मुदत २०२२ पर्यंत असली तरी कोरोनासह अन्य आजारांचा मृत्युदर वाढल्यामुळे निधी संपुष्टात आल्याने घनकचरा विभागाने वाढीव मान्यतेसाठी महासभेवर नव्याने तीन कोटी खर्चाचा प्रस्ताव ठेवला आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत झालेले मृत्यू, तसेच अन्य आजारांमुळे मृत्यू यांची संख्या २० हजारांच्या जवळ आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेत कोरोनामुळे मृत्युदर वाढला तर योजना संकटात येऊ नये यासाठी तीन कोटींची तरतूद आहे. डिझेल-विद्युत दाहिनींचा पर्याय स्वीकारणार्‍यांनाच मोफत अंत्यसंस्कार लाभ देण्याचा मनपाचा प्रस्ताव असताना, पर्यावरणाला हानी पोहोचवणार्‍या लाकूड-फाटा अंत्यविधीला प्राधान्य असेल.

- Advertisement -

Funeral

दोन महिन्यांत चार हजार मृत्यू

१ एप्रिल ते ३१ मे २०२१ या दोन महिन्यांमध्ये कोरोनासह अन्य आजारांमुळे जवळपास ४,१५३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत १४ महिन्यात २० हजार मृत्यूंची नोंद झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -