घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यातील ३ धरणे कोरडेठाक; अद्यापही काही भागात पाणीटंचाई

जिल्ह्यातील ३ धरणे कोरडेठाक; अद्यापही काही भागात पाणीटंचाई

Subscribe

नाशिक : धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच काहीशी परिस्थित मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात झाली असून, जिल्ह्यात तब्बल 24 लहान मोठी धरणे असताना देखील पावसाळा सुरु होऊन 20 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला 3 धरणांत उपयुक्त जलसाठा शून्य असून उर्वरित धरणांत देखील जेमतेम पाणी उरले आहे. जर लवकर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग आणि जोरदार पाऊस झाला नाही तर आगामी काळात मनमाड शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात गंगापूर, पालखेड आणि गिरणा खोरे असे तीन धरणसमूह असून त्यात 24 धरणे आहेत. त्यापैकी 7 मोठे तर 17 मध्यम धरणांचा समावेश आहे. या धरणांतून वेगवेगळ्या जिल्ह्यातही पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी सलग आणि चांगला पाऊस झाला होता. त्यानंतर अतिवृष्टी देखील झाली होती. त्यामुळे जवळपास सर्वच धरणे तुडुंब भरली होती. मात्र आता पावसाळा सुरु होऊन जवळपास 20 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झालेला नाही.

- Advertisement -

पावसाने ओढ दिल्यामुळे सर्वच धरणांतील पाण्याचा साठा झापाट्याने कमी होत असून सध्याच्या घडीला माणिकपुंज, आळंदी आणि तिसगाव या 3 धरणांत उपयुक्त जलसाठा शून्य आहे तर जिल्ह्यात सर्वात मोठे मानले जाणारे गिरणा धरणात केवळ 22 टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. उर्वरित धरणांतही जेमतेम पाणी उरले असून जर लवकर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग आणि जोरदार पाऊस नाही झाला तर आगामी काळात वेगवेगळ्या शहरा पाठोपाठ ग्रामीण भागात देखील भीषण पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ येऊ शकते.

धरणाची क्षमता, उपयुक्त शिल्लक जलसाठा (टक्केवारी दशलक्ष घनफुटात)

गंगापूर धरण 5630-1672 (30 टक्के)
काश्यपी 1852-123 (14 टक्के)
गौतमी गोदावरी 1868 (123 टक्के)
आळंदी 816-4 (0 टक्के)
पालखेड 653-216 (33 टक्के)
करंजवन 5371-702 (13 टक्के)
वाघाड 2302-147 (6 टक्के)
ओझंरखेड 2130-526 (25 टक्के)
पुणेगाव 623-69 (11 टक्के)
तिसगाव 455-0 (0 टक्के)
दारणा 7149-906 (13 टक्के)
भावली 1434-69 (5 टक्के)
मुकणे 7239-2592 (36 टक्के)
वालदेवी 1133-217 (19 टक्के)
कडवा 1688-311 (18 टक्के)
नांदूरमध्यमेश्वर 257-257 (100 टक्के)
भोजापूर 361-42 (12 टक्के)
चणकापूर 2427-673 (28 टक्के)
हरणबारी 1166-405 (35 टक्के)
केळझर 572-186 (33 टक्के)
नागासाक्या 397-15 (4 टक्के)
गिरणा 18500-4053 (22 टक्के)
पुनद 1306-444 (34 टक्के)
माणिकपुंज 335-0 (0 टक्के)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -