घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये ठाकरे गटातून आउटगोईंग सुरूच

नाशिकमध्ये ठाकरे गटातून आउटगोईंग सुरूच

Subscribe

सरकारच्या वर्षपुर्तीला पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

नाशिक : राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पुर्ण झाले. या वर्षपुर्तीच्या निमित्ताने नाशिकमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

वर्षभरापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत नवा गट स्थापन करत भाजप सोबत सरकार स्थापन केले. या सरकारला आता एक वर्ष पुर्ण होत आहे. गतवर्षभरात शिंदे गटाने नाशिकमधील शिवसेनेला सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाचे दोन आमदार, एक खासदार तसेच १३ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. ज्या ज्यावेळी खासदार संजय राऊत नाशिक दौर्‍यावर आले त्या त्या वेळी ठाकरे गटाला धक्का देण्याचे तंत्र अवलंबवले गेले. आता सरकारच्या वर्षपुर्तीच्यादिवशीही ठाकरे गटातील अनेक पदाधिकार्‍यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री दादा भुसे, सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला.

- Advertisement -

यावेळी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाप्रमुख शशीकांत कोठुळे, मध्य विधानसभा उपमहानगरप्रमुख नाना काळे, पश्चिम मतदारसंघाचे उपमहानगरप्रमुख अरूण घुगे, पूर्व विधानसभा उपमहानगरप्रमुख चंद्रशेखर शिंदे,शरद नामपूरकर, कुंदन दुसाने, योगेश वाणी, मयूर दाते, ज्योती शिंदे, प्रियांका सिंघ, जायदा शेख, मंगलाबाई जाधव, सुरेखा क्षिरसागर, शारदा थेटे , धनश्री मोहिते, पल्लवी शेळके, सुनिता पाटील, लिलावती भगत, सुमन जोपाळे, इंदुबाई बोरसे, पुष्पाबाई हिरे, संगीता वडतेले, भारती साळवे, नेहा मराठे, संगीता गांगुर्डे, कुंदा शिंदे, आशा सावकार, जिजाबाई माळी, रेवती शेंबेकर, प्रतिभा जगताप, अनिता शेळके, भारती परांडे या महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -