घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक-अहमदाबाद हवाईसेवा आता आठवडाभर

नाशिक-अहमदाबाद हवाईसेवा आता आठवडाभर

Subscribe

दिल्ली विमानसेवा जमिनीवर आली असताना नाशिक-अहमदाबाद सेवेला मात्र दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतो आहे.

दिल्ली विमानसेवा जमिनीवर आली असताना नाशिक-अहमदाबाद सेवेला मात्र दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतो आहे. प्रवाशांचा या सेवेला मिळणार प्रतिसाद पाहता आता ही सेवा आठवड्यातील सहा दिवस देण्यात येणार आहे. यापूर्वी ही सेवा तीनच दिवस दिली जात होती.

ओझर विमानतळाहून उडाण योजनेंतर्गत १२ शहरे जोडण्यास मंजूरी मिळाली असताना आतापर्यंत दिल्ली, अहमदाबाद, हैदाराबाद शहरे जोडली गेली आहे. यापूर्वी डेक्कन एअरवेजमार्फत नाशिकहून मुंबई, पुणे सेवा सुरू करण्यात आली, मात्र ही सेवा आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकच्या विमानसेवेला पुन्हा एकदा घरघर लागण्याची चिन्हे असताना जेट एअरवेजने सुरू केलेल्या नाशिक-दिल्ली विमानसेवेने नाशिकच्या हवाईसेवेला बळ दिले. मात्र, वेतनाअभावी जेटच्या वैमानिकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यातच कंपनी आर्थिक डबघाईस आल्याने इंडियन ऑईल कंपनीने इंधन पुरवठा बंद केल्याने आता देशभरातील जेटची विमाने जमिनीवर आली आहेत. असे असताना दुसरीकडे नाशिक-अहमदाबाद सेवेला मात्र चांगला प्रतिसाद लाभत आहे. ट्रू जेट आणि एअर अलायन्स कंपनीमार्फत ही सेवा दिली जात आहे. ट्रु जेटकडून बुधवार ते शनिवार ही सेवा दिली जात आहे. मात्र, आता ही सेवा सोमवार ते शनिवार असे सहा दिवस सुरू झाली आहे. या सेवांचे तिकिट दर हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच या दोन्ही कंपन्यांच्या सेवांची वेळ वेगवेगळी असल्याने नाशिककरांना सकाळी अहमदाबादला जाऊन सायंकाळी पुन्हा नाशिकला परतणे शक्य होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -