घरमहाराष्ट्रनाशिकसमाजकल्याण विभागात अवघे 434 लाभार्थी

समाजकल्याण विभागात अवघे 434 लाभार्थी

Subscribe

शिष्यवृत्ती योजनेची उदासीनता: शाळा, महाविद्यालये या योजनेपासून अनभिज्ञ

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सफाई कामगार, कचरा वेचणार्‍या नागरीकांच्या पाल्यास दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीचे जिल्ह्यात अवघे 434 लाभार्थी आहेत. जनजागृती अभावी या योजनेला लाभार्थी मिळत नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

स्वच्छता कामगार, कचरा वेचणार्‍या नागरीकांचे उत्पन्न अत्यल्प असल्यामुळे त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी समाजकल्याण विभागातर्फे इयत्ता दुसरी ते पदवी शिक्षनापर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक ते 5 हजार रुपये प्रतिमहिना शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेचे जिल्ह्यात केवळ 434 लाभार्थी असल्याची नोंद समाजकल्याण विभागात झाली आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक वर्ष संपले तरी शिष्यवृत्तीचे वाटप झालेले नाही. त्यामुळे दहावी उत्तीर्ण होऊन जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर शिक्षणासाठी स्थलांतरीत झाले आहेत. त्यांचा शोध घेवून शिष्यवृत्ती वाटपाचे खरे आव्हान समाजकल्याण विभागासमोर आहे. थेट खात्यावर पैसे वर्ग करण्याचे आदेश शासनाने दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे वर्ग केले जातात. मात्र, गेल्या वर्षी ‘डीबीटी’च्या सर्व्हरला अनेकदा अडथळा आल्यामुळे हे पैसे ऑफलाईन स्वरुपात वाटण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे समाजकल्याण विभागाला वेळेवर धावाधाव करुन विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागला होता. परिणामी, यंदा या योजनेपासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून सप्टेंबरमध्ये कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांना बोलवून या योजनेविषयी माहिती देण्यात येणार आहे.

- Advertisement -

लाभार्थी न मिळण्याची कारणे

समाजकल्याण विभागाला अनेक दिवस पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे या विभागाच्या अनेक योजना राबवताना उदासिनता दिसून येते. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती याविषयी वारंवार तक्रार करतात. परंतु, अधिकारी नसल्यामुळे आहे तोच निधी वेळेत खर्च होत नाही. त्यामुळे नवीन योजनांना हात घालण्यासाठी त्यांना वेळच मिळत नाही. शासन स्तरावरुन निधीचे वाटप होत असल्यामुळे शिष्यवृत्तीचे लाभार्थी वाढूच नये, याकडे शासकीय अधिकार्‍यांचा कल दिसून येतो. योजना राबवताना उदासीनता व लाभार्थी शोधण्याचा कंटाळा यामुळे समाजकल्याण विभागाला लाभार्थीच मिळत नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

- Advertisement -

13 व 14 सप्टेंबर रोजी मुख्याध्यापक व शिक्षकांची कार्यशाळा

जिल्ह्यातील सफाई कामगार, कचरा वेचणार्‍या नागरीकांच्या पाल्ल्यास देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीविषयी जनजागृती करणार आहोत. त्यासाठी 13 व 14 सप्टेंबर रोजी मुख्याध्यापक व शिक्षकांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या योजनेविषयी सर्वांना माहिती दिली जाईल. -मंगेश वाकचौरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी (नाशिक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -