घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमधून ७, तर दिंडोरीतून ६ उमेदवारांचे अर्ज बाद

नाशिकमधून ७, तर दिंडोरीतून ६ उमेदवारांचे अर्ज बाद

Subscribe

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आज झालेल्या अर्ज छाननी दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून ७ उमेदवारांचे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून ६ उमेदवारांचे अर्ज बाद झाले.

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आज झालेल्या अर्ज छाननी दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून ७ उमेदवारांचे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून ६ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे अर्ज छाननीनंतर नाशिकमधून २३ तर दिंडोरीतून ९ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. माघारीसाठी १२ एप्रिल दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत असून आता सर्वांचे लक्ष उमेदवारी अर्ज माघारीकडे लागले आहे.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीत ९ एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीपर्यंत ३० उमेदवारंचे ४१ अर्ज दाखल झाले. यात प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, अपक्ष अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार आदिंनी अर्ज दाखल केले. आज सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांच्या दालनात अर्ज छाननी प्रक्रीयेला सुरूवात झाली. शिवाजी वाघ या उमेदवाराने अनामत रक्कम न भरल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. भीमराव पांडवे हे प्रामुख्याने नांदेड येथील असल्याने त्यांनी मतदार यादीची प्रमाणित प्रत सादर केली नाही. मंगेश ढगे यांनी अर्जासोबत धनादेश दिल्याने आयोगाच्या निर्देशानूसार अनामत रक्कमेसाठी धनादेश, ऑनलाईन पेमंंट स्विकारले जात नाही त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. अपक्ष उमेदवार विष्णू जाधव यांनी दोन अर्ज दाखल केले होते परंतू त्यांनी अर्जावर स्वाक्षरी न केल्याने अर्ज बाद ठरला. शत्रुघ्न झोंबाड यांनी अनामत रक्कम न भरल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला. तर शेफाली भुजबळ यांनी डमी अर्ज दाखल केला होता. त्यांनी एबी फॉर्म न दिल्याने तसेच अर्जावर सुचकांच्या स्वाक्षरया नसल्याने भुजबळ यांचा अर्जही बाद करण्यात आला. अर्ज छाननीनंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातून आता २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

- Advertisement -

दिंडोरीत ९ उमेदवार रिंगणात

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून १५ उमेदवारांनी २७ अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीदरम्यान ६ उमेदवारांचे ११ अर्ज बाद ठरले. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रविण पवार, शिवसेनेकडून वेभव महाले, माकपाकडून हेमंत वाघेरे यांनी डमी अर्ज भरल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. अपक्ष उमेदवार गाझी एतजाज अहमद यांनी मतदार यादीची प्रमाणित प्रत न जोडल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. भारतीय ट्रायबल पक्षाचे उमेदवार बाबासाहेब बर्डे यांचा अर्ज अपूर्ण असल्याचे छाननी दरम्यान निदर्शनास आले तर किसान काँग्रेसचे उमेदवार शिवाजी मोरे यांनी एबी फॉर्म न जोडल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यामुळे आता या मतदारसंघातून माकपचे जिवा पांडू गावित, बसपाचे अशोक जाधव, राष्ट्रवादीचे धनराज महाले, भाजपच्या भारती पवार या चार मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार तर वंचित बहुजन आघाडीचे बापू बर्डे, राष्ट्रीय मराठा पक्षाचे दादासाहेब पवार, भारतीय ट्रायबल पक्षाचे दत्तु बर्डे या तीन नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. यासह टी. के. बागुल, हेमराज वाघ हे अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत.

माघारीकडे सर्वांचेच लक्ष

अर्ज माघारीनंतर आता नाशिकमधून २३ तर दिंडोरीतून ९ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. उमेदवारी माघारीसाठी १२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत असल्याने आता कोण माघार घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस प्रतिस्पर्ध्याच्या माघारीसाठी राजकिय डावपेच रंगणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -