घरमहाराष्ट्रनाशिकस्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा वीकएन्ड; नाशिककर पर्यटनाच्या मूडमध्ये

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा वीकएन्ड; नाशिककर पर्यटनाच्या मूडमध्ये

Subscribe

नाशिक : ऑगस्ट महिन्यात १५ तारखेचा स्वातंत्र्य दिन आणि दुसर्‍याच दिवशी असलेली पतेती या सलग दोन सार्वजनिक सुट्या येत असल्याने बँका आणि शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी सुट्यांचा बेत आखला आहे. त्यांनी शनिवार (दि.१२) ते बुधवार (दि.१६) या पाच दिवसांत सोमवारी (दि.१४) रजा टाकल्यास सलग पाच दिवसांच्या सुटीचा आनंद लुटण्याची तयारी केली आहे.

सार्वजनिक सुट्ट्या असल्याने शासकीय कार्यालये व बँका बंद राहणार आहेत. यातही दुसरा शनिवार आणि १३ ऑगस्टचा रविवार, यानंतर १४ ऑगस्टच्या सोमवारची एक रजा टाकण्याचे नियोजन अधिकारी-कर्मचार्‍यांनी केले आहे. यामुळे शहरालगतचे रिसॉर्ट, व्हिलाज्, विविध हॉटेल्सची बुकिंग आतापासूनच फुल झाली आहे. पर्यटन घडवून आणणार्‍या कंपन्यांच्या बुकिंगमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे. तर, गोव्यासाठी जाणार्‍या विमानांच्या तिकिटांचा दर १२ हजार रुपयांवर पोहोचलाय.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरचा भाग वगळता अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेठ, सुरगाणा, चांदवड या तालुक्यांत ऑगस्ट उजाडूनही नद्या किंवा धबधबे खळाळलेले नाहीत. त्यामुळे पर्यटनस्थळे अद्यापही गजबजलेली नाहीत. म्हणूनच अनेकांनी पर्यटनासाठी बाहेरची ठिकाणे निवडली आहेत.

हवाईसेवेला प्रतिसाद

पुढील आठवड्यात पर्यटनाचा बेत आखलेल्यांपैकी बहुतांश व्यक्तींनी निसर्गरम्य ठिकाणांना प्राधान्य दिले आहे. त्यानंतर समुद्रकिनारी आणि नंतर धार्मिक पर्यटनाला पसंती मिळाल्याचे पर्यटन व्यवसायातील उलाढालीवरुन समोर आले आहे. त्यातही तिरुपती बालाजी, शिर्डी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणांची सर्वाधिक पर्यटकांकडून निवड करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -