घरक्राइमविद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघालेल्या स्कूल व्हॅनला पीक-अपची जोरदार धडक; दैव बलवत्तर, अन्यथा..

विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघालेल्या स्कूल व्हॅनला पीक-अपची जोरदार धडक; दैव बलवत्तर, अन्यथा..

Subscribe

नाशिक : नाशिक शहरात दिवसागणिक अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. बेदरकारपणे, अतिवेगाने, नियमांच उल्लंघन करून वाहन चालविणे हे त्यामागील प्रमुख कारण आहे. अशीच एक अपघाताची भीषण घटना सोमवारी (दि. २६)  पंचवटी परिसरात घडली आहे. शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनला भरधाव मालवाहू पीक-अपने धडक दिली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ३ विद्यार्थी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, बिडी कामगार नगर परिसरातील इयत्ता ५वी व ६वीत शिकणारे १० ते १२ विद्यार्थी घेऊन सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास स्कूल व्हॅन नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला जात होती. यावेळी आडगाव नाक्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने तपोवन कॉर्नर येथे विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती की विद्यार्थी असलेली व्हॅन पलटी झाली. या अपघातात तीन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली असून बाकी विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पलटी झालेल्या स्कूल व्हॅन मधून अडकलेल्या विद्यार्थ्यांना तसेच चालकाला बाहेर काढले. दरम्यान, आडगाव पोलिसांना याबाबत कल्पना देऊन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, अपघात इतका भीषण होता की त्यात पीक-अपने धडक दिल्यानंतर स्कूल व्हॅन अक्षरशः पलटी झाली. अपघातात व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच ३ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून चालक व इतर विद्यार्थी किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. इतका भीषण अपघात होऊनही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. परंतु, बेदरकारपणे, भरधाव तसेच नियमांच उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्यांची संख्या शहरात वाढत असून त्यावर पोलीस यंत्रणेने वेळीच उपाय करावा अशी मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -