घरमहाराष्ट्रनाशिकविमानसेवेसाठी आयमाकडून इंडिगो एअरलाइन्सला साकडे

विमानसेवेसाठी आयमाकडून इंडिगो एअरलाइन्सला साकडे

Subscribe

अध्यक्षांसह शिष्टमंडळाची कंपनी व्यवस्थापकांसमवेत बैठक

नाशिक : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर नाशिकमधून देशातील विविध राज्यात व प्रदेशात इंडिगो एअरलाइन्सतर्फे विमानसेवा सुरु करण्यात यावी यासाठी आयमाच्या वतीने इंडिगो एअरलाईन्सला साकडे घालण्यात आले आहे.यासंदर्भात आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बुब, उन्मेष कुलकर्णी, आयपीपी राजेंद्र अहिरे, बीओपीपी चेअरमन धनंजय बेळे, एव्हिएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावल यांनी इंडिगो एअरलाईन्सचे व्यवस्थापक गौरव जाजू व मॅनेजर कॉर्पोरेट सेल्स शशांक लठू यांच्यासोबत विमानसेवा सुरु करण्याबाबत आयमाच्या सभागृहात बैठक घेतली. यावेळी नाशिकमधून इंडिगो एअरलाइंस राज्याच्या व देशाच्या विविध भागांत विमान सेवा सुरु करण्यास सकारात्मक असल्याचे इंडिगो एअरलाइंसचे व्यवस्थापक गौरव जाजू व मॅनेजर कॉर्पोरेट सेल्स शशांक लठू यांनी सांगितले.

याप्रसंगी आयमाचे अध्यक्ष तलवार यांनी नाशिकमधून इंडिगोने विमानसेवा सुरु करावी, यासाठी आयमाच्या माध्यमातून प्रयत्नशील असून याकरिता नाशिकमधून पोषक वातावरण असल्याचे सांगितले. आयमा बीओपीपी चेअरमन धनंजय बेळे यांनी नाशिकमधून व्यापार, उद्योग, कृषिक्षेत्र यास मोठा वाव आहे. इंडिगोच्या सेवेला उत्तम व चांगला प्रतिसाद मिळेल याविषयी तर उपाध्यक्ष निखिल पांचाळ यांनी नाशिकच्या उद्योग व्यवसायाबाबत माहिती दिली. एव्हिएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावल यांनी नाशिकमधून आजपर्यंत झालेल्या विमान प्रवाशांबाबत तपशील सांगितला. सर्व स्तरातून प्रतिसाद बघता नाशिकमधून विविध शहरात इंडिगो एअरलाइन्स सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले. सरचिटणीस ललित बूब यांनी आभार मानले. यावेळी जिंदाल पॉलिफिल्म्सचे संजय सिंग व आयमाचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -