घरमहाराष्ट्रMPSC Recruitment 2022 : नवीन वर्षात सरकारी नोकरीची सुवर्ण संधी, MPSC लवकरचं...

MPSC Recruitment 2022 : नवीन वर्षात सरकारी नोकरीची सुवर्ण संधी, MPSC लवकरचं ७५०० रिक्त पदे भरणार

Subscribe

शिक्षित तरुणांसाठी २०२२ या नव वर्षात आता सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२१ वर्षाअखेरपर्यंत राज्याच्या विविध विभागांकडून रिक्त जागांचे माहिती पत्र मागवले होते. या माहितीपत्रात एमपीएससीअंतर्गत तब्बल ७,५६० जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे येत्या वर्षात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे.

एमपीएससीने गेल्या वर्षी राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमधील विशेष अ, ब आणि क गटांतील एकूण रिक्तपदांची माहिती मागवली होती. यातून एमपीएससीकडे राज्याच्या २५ विभागांतील रिक्त पदांची संख्या प्राप्त झाली आहे. यात तिन्ही गटात तब्बल ७,५६० पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. यात अ गटात १४९९, ब गटात १२४५ पदे आणि क गटातील १५८३ रिक्त पदांचा समावेश आहे.

- Advertisement -

यामुळे यापूर्वी जाहिरातीतून प्रसिद्ध झालेली पदे वगळून अन्य पदांसाठीची कायदेशीर जाहिरात लवकरंच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आलेय. यासंदर्भातील सविस्तर यादी एमपीएससीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीने परीक्षांचे वेळापत्रक आणि जाहिराती लवकर प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जातेय.

एमपीएससीअंतर्गत रिक्त पदांची संख्या

कृषी, पशुसंवर्धन

मत्स्यव्यवसाय : ९२४
उद्योग, ऊर्जा, कामगार : २७९

- Advertisement -

अन्न, नागरी पुरवठा

ग्राहक संरक्षण : ६२
पाणीपुरवठा व स्वच्छता : १६
सामान्य प्रशासन : ९५७
मराठी भाषा : २१
आदिवासी विभाग : ०७
मुंबई महापालिका : २१
पर्यावरण : ०३
गृह : ११५९
वित्त : ३५६

वैद्यकीय शिक्षण

औषधी द्रव्ये : १५७२
उच्च व तंत्रशिक्षण : ३५
शालेय शिक्षण, क्रीडा : १०५ऑ
सहकार, पणन, वस्त्रोद्योग : ३२
कौशल्य विकास, उद्योजकता : १७१
महसूल व वन : १०४
ग्रामविकास व पंचायतराज : ३२
नगरविकास : ९०
मृदा व जलसंधारण : ११
जलसंपदा : ३२३
विधि व न्याय : २०५
नियोजन : ५५

सार्वजनिक आरोग्य : ९३७

कृषी, पशुसंवर्धन

मत्स्यव्यवसाय : ९२४
उद्योग, ऊर्जा, कामगार : २७९

अन्न, नागरी पुरवठा

ग्राहक संरक्षण : ६२
पाणीपुरवठा व स्वच्छता : १६
सामान्य प्रशासन : ९५७
मराठी भाषा : २१
आदिवासी विभाग : ०७
मुंबई महापालिका : २१
पर्यावरण : ०३
गृह : ११५९
वित्त : ३५६


मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटींचा घोटाळा; राज्यपालांचा शिवसेनेला नवा झटका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -