घरमहाराष्ट्रनाशिकअधिकमासात वाढला अनारशांचा गोडवा; जावई बापूना वाण

अधिकमासात वाढला अनारशांचा गोडवा; जावई बापूना वाण

Subscribe

तनुजा शिंदे । नाशिक

अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. या वाणात 33 अनारसेदेखील दिले जातात. त्यामुळे बाजारात तयार अनारश्यांची मागणी वाढली आहे. अनारसे बनविण्याची पध्दत वेळखाउ असल्याने विशेष करून नोकरदार महिलांकडून वर्गाकडून तयार पदार्थांनाच मागणी असते.

- Advertisement -

दर तीन वर्षांतून एकदा अधिक महिना येतो. यावर्षी 18 जुलैपासून अधिकमासाला सुरुवात झाली आहे. अनेक जावई ह्या महिन्याची आतुरतेने वाट बघत असतात. याचे कारण म्हणजे जावयाला ह्या महिन्यात धोंड्याचे वाण दिले जाते. या वाणात प्रामुख्याने चांदीचे ताट, भेटवस्तू, 33 बत्तासे, 33 अनारसे दिले जातात. याचमुळे सध्या बाजारात अनारश्यांची मागणी वाढली आहे. पूर्वी अनारसे घरीच बनवले जात. मात्र ते बनवण्याची वेळखाऊ पद्धत पाहता अलीकडे हळूहळू अनारसे घरी बनवणे बंदच झाले आहे. शक्यतो तयार अनारसेच दिले जातात किंवा घरीच बनवण्याची हौस असल्यास बाहेरून तयार पीठ आणून बनवले जातात. याकरीता बाजारात अनेक ठिकाणी तयार अनारस्यांचे स्टॉल्स देखील आहेत. शिवाय अनेक महिला हा व्यवसाय देखील करताना दिसत आहे. अनारसे तयार करण्यासाठीचे मिक्स देखील अनेक स्वरूपात बाजारात आले आहेत. यालाही महिलांची विशेष पसंती देत आहेत.

रेडिमेडकडे महिलांचा कल

महिलांची तयार अनारस्यांना मागणी अनारसे बनवण्याची प्रक्रिया ही अत्यंत किचकट आणि वेळखाऊ आहे. अनेक महिला नोकरी किंवा व्यवसाय करतात त्यामुळे वेळ वाया घालवण्यापेक्षा तयार अनारसे हे जास्त सोयीचे वाटतात. त्यामुळे महिला ह्या तयार अनारश्यांना अधिक पसंती देत आहेत.

अधिक महिना असल्याने अनारस्यांना चांगली मागणी आहे. साजूक तुपातील अनारश्यांना अधिक पसंती आहे. तुपाचे दर वाढल्यामुळे यंदा दरही वाढले आहेत. : अर्चना कुलकर्णी, श्रीराम गृहउद्योग

अशा आहेत किंमती

  • साजूक तुपातील अनारसे : 750
  • साध्या तुपातील अनारसे. : 500
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -