घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र‘त्या’ निर्दयी खूनामागील नवी माहिती समोर; मैत्रिणीला मेसेज करण्यावरून वाढली खुन्नस

‘त्या’ निर्दयी खूनामागील नवी माहिती समोर; मैत्रिणीला मेसेज करण्यावरून वाढली खुन्नस

Subscribe

नाशिक : मृत तुषार चावरे संशयित आरोपी सुलतानच्या मैत्रिणीला मेसेज करायचा. त्यातून दोघांत हाणामारी झाली होती. दिवसेंदिवस खुन्नस वाढत गेल्याने सहा जणांनी संगनमताने तुषारचा काटा काढल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. फरारी सहाव्या संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सोमवारी (दि. २४) संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

तुषार एकनाथ चावरे (वय १८, रा. सुयोगनगर, बोधलेनगर, नाशिकरोड, नाशिक) मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुलतान मुख्तार शेख (वय २१, दोघेही रा. गांगुर्डे चौक, पंचशील नगर, उपनगर, नाशिक रोड, नाशिक), रोहित मनोहर पगारे (१८), अमन मुस्ताक शेख(वय २०, रा. बजरंगवाडी, पुणे रोड) आणि विजय भगीनाथ रोकडे (वय ३०, रा. अरुणाचल सोसा, बोधले नगर, पुणे रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२२) रात्री साडेसात ते पावणे आठ वाजेच्या बोधलेनगर जवळून तुषार एकनाथ चावरे (वय १८, रा. सुयोगनगर, बोधलेनगर)हा मित्र सचिन गरुड याच्यासह दुचाकीवरुन जात असताना वरील संशयित मोपेड बाईकवरुन आले. त्यांनी चावरेला दमदाटी करत हत्यारे दाखविली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो काम करत असलेल्या चंद्रमा टिंबर मार्टकडे पळाला. त्यानंतर संशयितांनी पाठलाग करुन चॉपर व हत्यारांनी त्याच्यावर वार करून खून केला. पोलिसांनी पाठलाग करुन तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी (दि.२३) रात्री भद्रकाली पोलीस व उपनगर पोलिसांनी अमन शेख व विजय रोकडेला अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -