घरमहाराष्ट्रनाशिकबालभारतीच्या भांडार व्यवस्थापकाची ऑन ड्यूटी मद्य पार्टी

बालभारतीच्या भांडार व्यवस्थापकाची ऑन ड्यूटी मद्य पार्टी

Subscribe

लक्ष्मण डामसे पोलिसांच्या ताब्यात.

नाशिक : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक वितरण केंद्र बालभारती कार्यालयाचा भांडार व्यवस्थापक कार्यालयाच्या इमारतीत मद्यपान करीत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण तसेच शासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी भांडार व्यवस्थापक लक्ष्मण डामसे याला ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणी साठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

लेखानगर येथील बालभारती कार्यालयाचा मुख्य भांडार व्यवस्थापक लक्ष्मण यशवंत डामसे हा कार्यालयात मद्यपान करून महिला व इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांबरोबरच माथाडी कामगारांनाही त्रास देत असल्याची तक्रार पुस्तकी अधिक्षक शुभांगी नांदखिले ह्यांनी श्रमिक माथाडी व गार्डबोर्ड संघटनेच्या कार्यालयात केली होती. त्यानूसार संघटनेचे पदाधिकारी सागर देशमुख, निलेश साळुंके हे भांडार व्यवस्थापकांना भेटण्यासाठी गेले असता ते बालभारती कार्यालयाच्या वरती असेलल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी दारू पित असल्याचे आढळून आले.

- Advertisement -

संबंधितांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता डामसे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत पदाधिकरी व कर्मचाऱ्यांनी अंबड पोलीस स्टेशनला फोन करून ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच बालभारतीचे संचालक कृष्णकांत पाटील यांनाही फोन द्वारे कळवण्यात आले.प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी डामसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार संबंधित डामसे याला वैद्यकीय तपासणी साठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. त्यासबंधीचा अहवाल प्राप्त होताच त्या विभागाच्या वरिष्ठांकडे पाठविला जाईल व त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. -भगीरथ देशमुख, वपोनी. अंबड पोलीस ठाणे

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -