घरक्राइमशाळा, कॉलेससमोर घिरट्या घालणाऱ्या रोमरोमिओंना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद

शाळा, कॉलेससमोर घिरट्या घालणाऱ्या रोमरोमिओंना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद

Subscribe

नाशिक : शहरातील शाळा-कॉलेजजवळ रोडरोमियोंसह सिगारेटचे झुरके उडवित टवाळखोरी करणार्‍यांविरोधात नाशिक शहर पोलिसांनी मंगळवार (दि.२)पासून कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात २२२ टवाळखोर आणि सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्‍या १०३ अशा ३२५ जणांविरोधात कारवाई केली. या कारवाईमुळे रोडरोमिओंचे धाबे दणाणले आहेत.

नाशिक शहरातील अनेक शाळा व कॉलेजच्या आवारात रोडरोमिओं गर्दी करतात. ते शाळा व महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थिनींची छेड काढत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये मंगळवारी (ता. १) सकाळपासून मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष पवार व पथकाने रोडरोमिओंना दंडुक्याचा प्रसाद दिला. या विशेष मोहिमेदरम्यान बुधवारी (ता. २) १५७ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली. शाळा-महाविद्यालय परिसरापासून शंभर मीटर अंतरात असलेल्या पानटपर्‍यांवर प्रतिबंधित गुटखा, सिगारेट आढळून आल्याने अशा टपरी चालकांविरोधातही कारवाई झाली. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्‍या ६६ जणांवर कोटपा कायद्यान्वये कारवाया करण्यात आल्या. बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत पीसीबी-एमओबीकडील पथकाने एकूण २२३ कारवाया करण्यात आल्या.

- Advertisement -

पान टपऱ्यांही रडारवर 

शाळा तसेच महाविद्यालय परिसरात कोणत्याही प्रकारे अमली पदार्थ विक्री किंवा सेवन करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, शहरात बऱ्याच ठिकाणी या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे बघायला मिळत आहे. शाळा तसेच महाविद्यालयांच्या बाहेर बिनदिक्कत पान टपऱ्यावर सिगारेट, तंबाकू, गुटख्याची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी आता या पान टपऱ्यांवर लक्ष केंद्रित करत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -