घरलाईफस्टाईलLazy girl jobs चा ट्रेंन्ड नक्की काय आहे?

Lazy girl jobs चा ट्रेंन्ड नक्की काय आहे?

Subscribe

कॉर्पोरेटमध्ये काम करणारे नेहमीच असा विचार करता की, कमीत कमी सुट्ट्या घेऊन अधिक काम करावे किंवा अधिक वेळ ऑफिसमध्ये काम करत बसल्यास याचा जॉब करियरवर उत्तम प्रभाव पडतो. अशातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक टर्म आजकाल फार ट्रेंन्ड मध्ये आहे. ती म्हणजे लेजी गर्ल जॉब. ही टर्म जुन्या कॉर्पोरेट वर्क कल्चरच्या अगदी विरुद्ध आहे. (Lazy girl jobs trend)

लेजी गर्ल जॉब नावाच्या या टर्मनुसार, जॉब करण्याची अशी पद्धत आहे त्यामध्ये व्यक्तीवर ऑफिस आणि कामाचे टेंन्शन फार कमी असते. त्याचसोबत यामध्ये आपल्या वर्क लाइफसोबत पर्सनल लाइफ सुद्धा व्यवस्थितीत बॅलेंन्स करु शकतो. लेजी गर्ल जॉबचा अर्थ असा होतो की, अशा वातावरणात काम करणे जेथे तुम्हाला अधिक ताण घेण्याची अजिबात गरज भासत नाही.

- Advertisement -

नव्या जनरेशनचे टिक टॉक युजर्स काम करण्यासाठी या नव्या ट्रेंन्डला फार प्रमोट करत आहेत. हा नवा ट्रेंन्ड त्या मानसिकतेला चॅलेंज करत आहे ज्यामध्ये लोक असे मानतात की, करियरमध्ये यश मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या डेस्कवर राहून अधिक वेळ काम करायचे असते.

नक्की काय आहे लेजी गर्ल जॉब?
यामधील लोकांचा रोल नॉन-टेक्निकल असतो. कर्मचाऱ्यांचे काम करण्याचे तास फिक्स नसतात. म्हणजेच तुम्हाला 8-9 तास काम करण्याची काहीही गरज नसते. तुम्ही तुमच्या मनानुसार किती ही तास काम करु शकता. या जॉबमध्ये कर्मचारी आपली बेसिक कॉस्ट ऑफ लिविंग जसे वर्क बॅलेन्स, मुलांची काळजी आणि अन्य कामे सुद्धा करु शकतात.

- Advertisement -

लेजी गर्ल जॉब विरुद्ध टॉक्सिक वर्कप्लेस
एक टिक टॉक युजरने असे म्हटले की, जर आपण जुन्या वर्क कल्चर बद्दल पाहिले तर, बहुतांश लोक जी ऑफिसमध्ये सर्वजण येण्यापूर्वी येतात आणि सर्वजण घरी गेल्यानंतर जातात. अशा लोकांना लेजी टर्म बद्दल फार कौतुक वाटते. कारण ही टर्म एका सामान्य ऑफिसच्या टॉक्सिक वातावरणापेक्षा फार वेगळे असते.

विविध जनरेशन बद्दल बोलायचे झाल्यास तर लेजी गर्ल जॉबचा ट्रेंन्ड अधिक पसंद केला जात आहे. मात्र काही लोक अशी सुद्धा आहेत जी यावर विविध प्रश्न उपस्थितीत करत आहेत. लेजी गर्ल जॉब बद्द कर्मचारी आणि बॉस यांच्यामधील विचारसरणी सुद्धा फार वेगली आहे.


हेही वाचा- वर्किंग मॉम आहात, बाळाला ब्रेस्ट फीडींगची चिंता सतावतेय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -