घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेने न्यायकारक करवाढ रद्द करा

महापालिकेने न्यायकारक करवाढ रद्द करा

Subscribe

शिंदे गटाचे महापालिका आयुक्तांना निवेदन

नाशिक : तात्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २०१८ ते २०१९ दरम्यान स्वतःच्या अधिकारात मिळकतीच्या मूल्यांकन दरामध्ये (रेटेबल व्हॅल्यू) केलेल्या अन्यायकारक वाढीमुळे सर्वसामान्य व्यापारी तसेच उद्योजकांचे कंबरडे मोडले असून ५०० चौरस फुटांचा विचार केला तर निवासी मिळकतींमध्ये सर्वसाधारणपणे १८८८ तर औद्योगिक मिळकतीसाठी तब्बल २८ ६०१ रुपयांची वाढ झाली आहे. तसेच वाणिज्य अर्थातच व्यापारी आस्थापनांचा विचार केला तर २२९०८ रुपये वार्षिक वाढीव द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेत शिंदे गटाचे नेते तथा पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पालिका आयुक्तांकडे ही अन्यायकारक करवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

बोरस्ते यांनी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांसोबत आयुक्तांची भेट घेतली. १ एप्रिल २०१८ नंतर अस्तित्वात येणार्‍या मिळकतींमध्ये करवाढ केल्यामुळे शहरात प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. चार वर्षांपूर्वी ज्यावेळी हा निर्णय झाला त्यावेळी विरोधी पक्षनेता या नात्याने महासभेमध्ये संबंधित जिझिया करवाढीविरुद्ध चर्चा घडवून आणली होती. दरडोई उत्पन्न व सध्याच्या चालू बाजारभावानुसार वाजवी भाडे मूल्य यांचा विचार केल्यास नाशिक महापालिकेने वाणिज्य वापरातील मिळकतींच्या मूल्यांकन दरात अतिशय अवाजवी वाढ केल्यामुळे महागाई वाढणार आहे.

- Advertisement -

दर वाढवल्यामुळे शहरात नवीन उद्योग येणार नाही. औद्योगिक वसाहतींचे स्वतंत्र वर्गीकरण पूर्वीप्रमाणे कायम ठेवणे व पूर्वीच्या दराच्या दुप्पट प्रमाणे मूल्यांकन दर आकारणीत बदल करण्याकरता आदेशामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे बोरस्ते यांनी निवेदनात म्हटले आहे. औदयोगिक वसाहतींचा कर निर्धारणाचा मूल्यांकन दर हा महापालिका अस्तित्वात आल्यापासून निवासी दरापेक्षा कमी ठेवण्यात आले होते. त्यानुसार नाशिक शहरात मूल्यांकन दराबाबत निवासी, बिगर निवासी व औद्योगिक याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले होते. मात्र त्यास बिगर निवासी या दर्जामध्ये समावेश करण्यात आला.

औद्योगिक वसाहतींमधील मिळकतीवर मालमत्ताकर लागू करताना त्यास बिगर निवासी मुल्यांकन दर ४४ रुपये प्रति चौ.मी प्रति मासिक याप्रमाणे करनिर्धारण करण्यात येत आहे. पूर्वीचा दर ४.९५ रुपयांनुसार नऊपटीने वाढ दिसून येत असल्याची तक्रार केली.यावेळी प्रवण तिदमे, सचिन भोसले, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, चंद्रकांत खाडे, सुदाम डेमसे, सचिन भोसले, प्रताप मेहरोलिया, सुवर्णा मटाले, संगीता जाधव, पूनम मोगरे, ज्योती खोले, जयश्री खर्जुल आदी उपस्थित होते.

- Advertisement -

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -