घरमहाराष्ट्रनाशिकशहरातील लंडन पॅलेस जमीनदोस्त

शहरातील लंडन पॅलेस जमीनदोस्त

Subscribe

महापालिकेने अतिक्रमित बांधकाम पाडले;शहरातील मोठ मोठ्या राजकारणी मंडळींच्या मुला मुलींचे शाही विवाह होण्याच्या ठिकाणावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाचा हातोडा

शहरातील बड्या हस्थींचे विशेषतः पुढाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे विवाह सोहळे होणाऱ्या लंडन पॅलेसचे अतिक्रमण महापालिकेने बुधवारी (ता.२८) हटविले. पंचवटीतील या उंची मंगल कार्यालयाचे अतिक्रमण हटविताना बघ्यांची गर्दी झाली होती.

पंचवटी विभागातील, तपोवन चव्हाण नगर येथील लंडन पॅलेसचे येथील अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या वतीने तोडण्यात आले. एका बड्या राजकीय पुढाऱ्याचा या कार्यालय व्यवस्थापनावर वरदहस्त होता असे बोलले जाते. मात्र बुधवारी अतिक्रमण विभागाचा जेसीबी अखेर लंडन पॅलेसच्या अतिक्रमित बांधकामावर फिरलाच. काही क्षणात हे कोट्यवधींचे बांधकाम जमीन दोस्त करण्यात आले. ही कारवाई साहाय्यक आयुक्त तथा प्रभारी उपआयुक्त (अतिक्रमण) जयश्री सोनवणे यांच्या सूचनेप्रमाणे विभागीय अधिकारी आर.एस. पाटील, एस.डी. वाडेकर , श्री. रविंद्र धारणकर, महेंद्रकुमार पगारे , हेमंत नांदुर्डीकर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे 5 पथके व दैनंदीन अतिक्रमण निमुर्लन पोलीस यांनी केली.

- Advertisement -

यापूढे सहाही विभागांमध्ये ना-फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक इ. ठिकाणी अतिक्रमणे करुन व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांचेविरुध्द अशाच प्रकारची कडक कारवाई करुन प्रसंगी पोलीस विभागात गुन्हे देखील दाखल करण्यात येतील, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.

तसेच शहरातील बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या तसेच पार्कींगच्या जागांवर असलेली बेकायदेशीर व अतिक्रमीत असलेली बांधकामे काढुन घेण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी जाहिर आवाहनाव्दारे सूचना दिलेल्या आहेत. ज्या-ज्या नागरीकांनी, व्यावसायिकांनी, विक्रेत्यांनी त्यांचे अतिक्रमणे/अनधिकृत बांधकामे काढुन घेतलेली नाही, त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करणेत येईल, तेव्हा ज्यांनी-ज्यांनी असे बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे केलेली आहेत. त्यांनी ती सत्वर काढून घेऊन मनपास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -