घरक्राइम'सारूळ'चे क्रशर सील; जिल्हाधिकार्‍यांची धडक कारवाई

‘सारूळ’चे क्रशर सील; जिल्हाधिकार्‍यांची धडक कारवाई

Subscribe

नाशिक : अप्पर जिल्हाधिकार्‍यांकडून गौण खनिज व इतर कार्यभार काढून घेतल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी सारूळ येथील खाणपट्ट्यावर (क्रशर) धडक कारवाई केली आहे. सारूळ येथील एकूण २१ खाणपट्टे सील करण्यात येणार असल्याचे समजते. मंगळवारी (दी.१३) जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडील गौणखनिज विभागाचा कार्यभार काढून घेतल्यानंतर आज ही धडक कारवाई केली आहे. मागील अनेक वर्षापासून सारूळ येथील खाणपट्टा (क्रशर) संदर्भात अनेक तक्रारी होत्या. नियमबाह्य पद्धतीने याठिकाणी डोंगर पोखरल्याच्या अनेक तक्रारी होत्या. मात्र यावर कारवाई करण्याचा दिखावा करून फक्त कागदपत्री कामकाज केले जात होते. मात्र आता जिल्हाधिकार्‍यांनी थेट २१ खानपट्टे सील करण्याचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक बोकाळली आहे. नाशिक तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेल्या काही वर्षांत उत्खननाच्या नावाखाली डोंगर पोखरण्याचे ‘उद्योग’ सुरू आहेत. अशा अनधिकृत उत्खननामुळे डोंगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने अशा अवैध उत्खननावर लक्ष केंद्रित केले आहे.

- Advertisement -

सह्याद्री पर्वतरांगेतील संतोषा, सारूळ आणि भांगडी डोंगररांगेत नऊ खाणपट्टा मालकांनी महसूल विभागासह वन अधिनियमाचे नियम धाब्यावर बसवून अवैध उत्खनन केल्याचे यापूर्वी उघडकीस आले होते. त्यामुळे अवैध उत्खनन करणार्‍या खाणमालकांवर जिल्हाधिकारी व त्यांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त करण्यात आली आहे. यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने नऊ खाणपट्टा मालकांनी वन आणि महसूल विभागाचे नियम धाब्यावर बसवत अवैध उत्खनन केल्याचा अहवाल दिला होता. खाणपट्टा धारकांनी वनविभागाच्या प्रचंड मोठ्या जागेवर आणि डोंगरावर अतिक्रमण करीत ते क्षतीग्रस्त केलेले आहे. एक इंच मातीचा थर बनण्यासाठी हजारो वर्षे लागतात. अशी गौण खनिज मालमत्तेची खाणपट्टाधारकांनी वन कायदा ६३ ब चा भंग करीत वाट लावल्याचाही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -