घरमहाराष्ट्रलागेल ते करावे, परंतु वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाऊ देऊ नका; अजित पवारांची...

लागेल ते करावे, परंतु वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाऊ देऊ नका; अजित पवारांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Subscribe

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांनी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे. विरोधकांकडून हा प्रकल्प महाराष्ट्रातचं व्हावा यासाठी शिंदे फडणवीस सरकारने प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. अशातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाऊ देऊ नका, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तसेच हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातला गेला. यातून महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचाही प्रयत्न आहे. असा आरोपी अजित पवारांनी या पत्रातून केला आहे.

अजित पवारांनी पत्रात नेमकं काय म्हटले?

वेदांता ग्रुपचा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रिकेशनचा तळेगांव येथे येणारा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरात येथे नेल्याचे कळते. वेदांता व तैवान येथील फॉक्सकॉन या कंपनीचे 60:40 असे जॉईन्ट व्हेंचर झाले आहे. सर्वसाधारणपणे २ लाख कोटींची गुंतवणूक व अंदाजे १.५ लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प उभारणी या कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलगांणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा केली.

- Advertisement -

जागा निवडीसाठी एकूण 100 मुद्द्यांचा विचार करुन त्यांनी तळेगाव टप्पा 4 ही जागा अंतिम केली. त्यासाठी तळेगांव येथील त्यांना आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टिव्हिटी, JNPT शी असणारी कनेक्टिव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने त्यांनी तळेगाव येथील 1000 एकर जागेची निवड केली होती. वेदांताच्या वरिष्ठ टीमने सर्व बाबींचा विचार करुन तळेगाव हेच ठिकाण योग्य असल्याचे सुचविले आहे. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने त्यांना बऱ्याच सवलती देण्याचे मान्य केल्याचे कळते. मात्र वरिष्ठ राजकीय दबावापोटी ही गुंतवणूक गुजरात येथे गेल्याचे कळते. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित आहे. या ठिकाणी तळेगावच्या तुलनेत काहीच नाही.

गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सांमजस्य करार (MOU) करणार आहेत, असे कळते. अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी राज्य सरकारने लागेल ते करावे. पंरतु ही गुंतवणूक जाऊ देऊ नये. यामुळे महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. कारण यामधून मोठ्या प्रमाणावर GST मिळणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात यावे, ही विनंती अजित पवारांनी पत्रातून केली आहे.

- Advertisement -

ncp leader ajit pawar write letter cm eknath shinde on vedanta foxconn row

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवल्याप्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील तळेगावंमध्ये होणारा हा प्रकल्प अचानक गुजरातला नेल्याने शिंदे फडणवीस सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान अखेरच्या क्षणी हा प्रकल्प गुजरातला गेल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र हा प्रकल्प गुजरातला जाण्यामागे तत्कालीन महाविकास आघाडीचे अपयश जबाबदार असल्याचा पलटवर सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांकडून केला जात आहे.


वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राला काय होणार तोटा?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -