घरताज्या घडामोडीनाशिक अमरधाममध्ये तब्बल १४ मृतदेहांना अंत्यसंस्काराची प्रतीक्षा

नाशिक अमरधाममध्ये तब्बल १४ मृतदेहांना अंत्यसंस्काराची प्रतीक्षा

Subscribe

आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीष पालवेंनी केली पाहणी; विदारक चित्र दिसले समोर

कोरोनाकाळात रुग्णांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत असताना मृत्यूनंतरही त्यांच्या देहाची अवहेलना संपताना दिसत नाही. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांनीही अमरधामला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी तब्बल १४ मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज बाहेरच मृतदेह बराचकाळ ठेवलेले असतात. त्यांच्या आजूबाजूला रुग्णांचे नातेवाईक ये- जा करीत असतात. तर दुसरीकडे महापालिकेच्या विद्युत दाहिनीतही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ‘वेटींग’ असल्याचं विदारक चित्र समोर येतंय. तब्बल १२-१२ तास मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत नसल्याने मृतांचे नातेवाईक मेटाकुटीस येतात. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आ. राहुल ढिकले, अध्यक्ष गिरीष पालवे यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी जुने नाशिक परिसरातील अमरधामला भेट दिली. त्यावेळी १४ मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी नवीन विद्युत दाहिनी बसवण्यात यावी अशी मागणीही त्यांनी आयुक्तांना पत्र देऊन केली.

 

नाशिक अमरधाममध्ये तब्बल १४ मृतदेहांना अंत्यसंस्काराची प्रतीक्षा
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -