घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक येथील मॉल्समध्ये धोकादायक गर्दी

नाशिक येथील मॉल्समध्ये धोकादायक गर्दी

Subscribe

अपुर्‍या पार्किंगमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा; अपघातांनाही निमंत्रण

विजय आव्हाड , नाशिक : विल्होळी जकात नाका महानगरपालिका हद्दीत नव्याने सुरू झालेल्या डी.मार्ट येथे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर झुंबड उडाली असून कोरोनाच्या नियमांची अक्षरशः पायमल्ली सुरू आहे. ग्रामीण भाग व शहरी भाग यांच्या मध्यवर्ती परिसरात पहिलाच डी. मार्ट मॉल सुरू झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने जमावबंदीसह लग्न सोहळे, सभा अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांमधील उपस्थितीवर निर्बंधन लावले आहेत.

मात्र, याचा कोणताही विचार न करता मॉलमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे या नियमांचा विसर पडलेला दिसतो आहे. अनेक ग्राहक एवढ्या अलोट गर्दीतदेखील कोरोना नियम पळताना दिसत नाहीत. त्यामुळे या मॉलमध्ये होणार्‍या गर्दीतून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराची मॉल व्यवस्थापन व पालिका आरोग्य विभागाने दखल घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नियमभंग करणार्‍यांविरुद्ध पोलीस व महानगरपालिका यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जाते आहे.

- Advertisement -

मॉलची अपुरी पार्किंग व्यवस्था असल्याने सर्व बहुतांशी ग्राहकांच्या मोटरसायकल, कार आदी वाहने मुंबई-आग्रा महामार्गावर दुतर्फा उभ्या असल्यामुळे येणार्‍या जाणार्‍या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. त्यातूनच लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. मॉलमधील गर्दी पाहता मॉल व्यवस्थापनाने पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करुन देण्यासह कोरोना नियमांच्या पालनाची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -