घरमहाराष्ट्रनाशिकदेवळा नगरपंचायत निवडणूक:प्रभागांसाठी ७४ अर्ज दाखल

देवळा नगरपंचायत निवडणूक:प्रभागांसाठी ७४ अर्ज दाखल

Subscribe

भाजप,राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस,शिवसेना,शिवसंग्राम पक्षातील उमेदवारांनी दाखल केले अर्ज

देवळा : नगरपंचायत निवडणुकीसाठी ओबीसीसाठी राखीव चार वॉर्ड वगळता उर्वरित १३ प्रभागांसाठी ७४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सी.एच. देशमुख यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी घडामोडींना वेग आला असून निवडणूक वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. निवडणूक होईपर्यंत अजून काय घडामोडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शिवसंग्राम या पक्षांतील उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
उमेदवारी अर्ज छाननी बुधवार (दि.८) रोजी असून माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल. देवळा नगरपंचायतीच्या निवडणूक रंगसंग्रामात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असे चित्र असतानाच घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे शहरप्रमुख मनोज आहेर यांनी भाजपत प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या उपस्थितीत नुकताच त्यांनी प्रवेश केला असून यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आहेर यांच्या प्रवेशाने शिवसेनेला खिंडार पडले असून त्यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे.
२१ डिसेंबरला होऊ घातलेल्या नगरपंचायतीमधील ओबीसी प्रभागातील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने देवळा नगरपंचायत नगरपंचायतीच्या ४,८,१० व १३ या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. यामुळे प्रभागातील इच्छूक उमेदवारांना पुढील निर्णयांची प्रतीक्षा करणे भाग आहे.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -