घरमहाराष्ट्रनाशिकघोटी शहरात धाडसी घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास

घोटी शहरात धाडसी घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Subscribe

चार अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह तब्बल सव्वा लाख चोरले

इगतपुरी : घोटी शहरातील रामराव नगर येथील बंद घराचा दरवाजा तोडुन चार अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह तब्बल सव्वा लाखांची चोरी केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बर्‍याच दिवसांपासुन बंद असलेल्या चोरीच्या घटना पुन्हा सुरु झाल्याने या परिसरात दहशत पसरली असून रात्रीच्या वेळी पोलीसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. या चोरी बाबत शिवाजी काशिनाथ कडू यांनी घोटी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, दि. ५ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रामरावनगर जवळील विठ्ठलनगर येथील शिवाजी काशिनाथ कडू यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चार अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील ऐवज चोरून नेला. या घरफोडीत घरातील ५० हजार रुपये रोख, ६० हजार रुपये कीमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १५००० रुपये किंमतीचा क्राऊन कंपनीचा टीव्ही, ३००० रुपये किंमतीचा फिनोलेक्स कंपनीचा वॉल फॅन, १००० रुपये किंमतीचा वॉल फॅन असा एकूण १ लाख २९ हजार रुपये किंमतीचा माल चोरी झाला आहे. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -