घरमहाराष्ट्रनाशिकतब्बल 2 हजार 271 कोटींच्या खरीप पीक कर्जाचं वाटप

तब्बल 2 हजार 271 कोटींच्या खरीप पीक कर्जाचं वाटप

Subscribe

यंदाच्या आव्हानात्मक काळात ग्रामपंचायत निवडणुका असल्यानं जिल्ह्यात प्रदीर्घ काळ आचारसंहिता लागू होती. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचे पैसे खूप उशीरा प्राप्त झाले.

खरीप हंगामातल्या पीककर्ज वितरणाच्या अखेरच्या मुदतीपर्यंत जिल्ह्यात तब्बल 2 हजार 271 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं. गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 658 कोटी एवढं वाढीव पीककर्ज शेतकर्‍यांना वाटप करण्यात आलं. करोनामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकर्‍यांना या कर्जपुरवठ्यामुळे मोठा दिलासा मिळालाय. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षांमध्ये आपण दोन हजार 271 कोटी रुपयांचा टप्पा पहिल्यांदाच पार केलं असल्याचं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलं. यंदाच्या आव्हानात्मक काळात ग्रामपंचायत निवडणुका असल्यानं जिल्ह्यात प्रदीर्घ काळ आचारसंहिता लागू होती. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचे पैसे खूप उशीरा प्राप्त झाले. त्याचबरोबर कोरोनासारख्या काळातही आपण या सगळ्यावर मात करुन जास्तीत कर्ज वितरणावर भर दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -