घरताज्या घडामोडीदिंडोरी : ओबीसी राखीव प्रभागांची निवडणूक स्थगित

दिंडोरी : ओबीसी राखीव प्रभागांची निवडणूक स्थगित

Subscribe

नगरपंचायत निवडणुकीच्या १५ जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणात, अर्ज छाननीत १० अर्ज बाद

दिंडोरी – नगरपंचायत निवडणुकीत अर्ज छाननीत १० उमेदवारी अर्ज बाद झाल्याने १५ जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणार राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ओबीसींसाठी राखीव प्रभाग ११ व १६ ची निवडणूक स्थगित झाली आहे.

मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुकांची गर्दी होत १७ जागांसाठी १०२ अर्ज दाखल झाले होते. मात्र, आता ओबीसींसाठी राखीव दोन जागांना स्थगिती आल्याने १५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी व भाजप प्रत्येकी १३ जागा लढवत असून, शिवसेना ११, काँग्रेस व मनसे प्रत्येकी २ जागा लढवणार आहेत. दोन वॉर्डांमध्ये सरळ तर इतर बहुतांशी वॉर्डांमध्ये तिरंगी लढतीची चिन्हं आहेत. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल.

प्रभागनिहाय उमेदवार असे

  • प्रभाग क्र. १ – रोहिणी भगवान गायकवाड (भाजप), मीराबाई नारायण पारखे (अपक्ष), रत्नाबाई सुभाष बोरस्ते (शिवसेना), निर्मला कैलास मवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस), मेघा केशवराव शिंदे (अपक्ष)
  • प्रभाग क्र. २ – अविनाश बाबूराव जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), रचना अविनाश जाधव (अपक्ष), सुहास अनिलराव देशमुख (शिवसेना), रचना विक्रमसिंह राजे (भाजप), निलेश भाऊसाहेब शिंदे (अपक्ष)
  • प्रभाग क्र. ३ – कल्पना संतोष गांगोडे (शिवसेना), जिजा शांताराम चारोस्कर (राष्ट्रवादी काँग्रेस), राणी रवी भोई (भाजप)
  • प्रभाग क्र. ४ – सचिन बंडू पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), अक्षय वसंत बदादे (भाजप), सुनीता रमेश लहांगे (शिवसेना)
  • प्रभाग क्र. ५ – फारुक मोहमद खान (भाजप), नरेश भास्करराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रितम प्रकाशराव देशमुख (अपक्ष), प्रदीप श्रीकांत देशमुख (शिवसेना)
  • प्रभाग क्र. ६ – अरुणा रणजित देशमुख (भाजप), सुनीता आण्णासाहेब बोरस्ते (राष्ट्रवादी काँग्रेस), कमल दत्तू शिंदे (अपक्ष)
  • प्रभाग क्र. ७ – प्रिया निलेश गायकवाड (अपक्ष), राजश्री सतीश देशमुख (शिवसेना), संगीता प्रमोद देशमुख (भाजप), श्रध्दा सुहास देशमुख (अपक्ष), लता रमेश बोरस्ते (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • प्रभाग क्र. ८ – शैला सुनील उफाडे (काँग्रेस), वैशाली विनोद चव्हाण (अपक्ष)
  • प्रभाग क्र. ९ – निकीता प्रितम कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), मेघा नितीन धिंदळे (शिवसेना), जयश्री एकनाथ हिंडे (भाजप)
  • प्रभाग क्र. १० – जयेश श्याम गवारे (काँग्रेस), नितीन मधुकर गांगुर्डे (भाजप), लता दशरथ निकम (राष्ट्रवादी काँग्रेस), बाळू बाबुराव साठे (शिवसेना)
  • प्रभाग क्र. ११ – आशा भास्कर कराटे (भाजप), राकेश गुलाब गांगोडे (अपक्ष), तुषार रामदास चारोस्कर (अपक्ष), धनराज सुनील भवर (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • प्रभाग क्र. १२ – ज्योती सचिनराव देशमुख (शिवसेना), पूजा अविनाश देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस), शुभांगी अमोल मवाळ (मनसे)
  • प्रभाग क्र. १३ – अक्षय अशोक चारोस्कर (अपक्ष), दीपक भास्कर जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रशांत भालचंद्र मोगल (शिवसेना), तुषार मधुकर वाघमारे (भाजप), प्रवीण सोमनाथ सोनवणे (अपक्ष)
  • भाग क्र. १४ – सुनीता सुनील अस्वले (मनसे), प्रज्ञा तुषार वाघमारे (भाजप), नंदिनी अनिल साठे (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • प्रभाग क्र. १५ – सुजित त्र्यंबक मुरकूटे (शिवसेना), दिनेश केशवराव शिंदे (अपक्ष)
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -