घरताज्या घडामोडीBangladesh: फेसबुक पोस्टमुळे साथीदाराची हत्या केल्यामुळे बांगलादेशात २० विद्यार्थ्यांना फाशीची शिक्षा

Bangladesh: फेसबुक पोस्टमुळे साथीदाराची हत्या केल्यामुळे बांगलादेशात २० विद्यार्थ्यांना फाशीची शिक्षा

Subscribe

दोन वर्षांपूर्वी सरकारवर टीका करणारी फेसबुक पोस्टमुळे वसतिगृहातील एका विद्यार्थ्याची मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी बांगलादेशच्या एका न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. याप्रकरणी न्यायालयाने २० विद्यार्थ्यांना फाशी देण्याची शिक्षा सुनावली आहे. विद्यार्थी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात (BUET) शिकत होते.

ढाका येथील जलद खटला न्यायाधिकरण-१चे न्यायाधीश अबू जफर मोहम्मद कमरुज्जमा यांनी विद्यार्थ्याची हत्या केल्याने २० आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच इतर विद्यार्थांना जन्मठेप सुनावली आहे. निकालात म्हटले की, या प्रकरणाच्या क्रूरतेने न्यायालयाला भविष्यात याप्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी आरोपींना मृत्यूदंड देण्यासाठी मजबूर केले. न्यायालयाने एकूण २५ आरोपींमधील कोणालाही निर्दोष केले नाही.

- Advertisement -

दरम्यान यामधील तीन जणांच्या अनुपस्थितीत खटला चालवला गेला. कारण २१ वर्षी अबरार फहादच्या हत्येनंतर ६ ऑक्टोबर २०१९ पासून फरार झाले होते. सर्व आरोपी विद्यार्थी सत्ताधारी अवामी लीगच्या विद्यार्थी शाखा बांगलादेश विद्यार्थी लीगशी (BCL) संबंधित होते.

बीसीएलने या विद्यार्थ्यांना संघटनेतून काढून टाकले होते. तसेच बीयूईटी अधिकाऱ्यांनी घटनेनंतर त्वरित या आरोपी विद्यार्थांना देखील काढून टाकले होते. भारतासोबत नद्यांच्या पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी अवामी लीगवर टिका केल्यानंतर फहादला मारहाण करून हत्या केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – CDS Bipin Rawat आणि १३ जणांच्या मृतदेहांची ओळख कशी पटली ? भारतीय सेनेचा खुलासा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -