घरमहाराष्ट्रनाशिकपालघर जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; पुढील महिन्यात 'या' तारखेला होणार मतदान

पालघर जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; पुढील महिन्यात ‘या’ तारखेला होणार मतदान

Subscribe

बोईसर : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे पालघर जिल्ह्यातील सात तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढील महिन्यात 5 नोव्हेंबरला होणार आहेत तर, 49 ग्रामपंचायतींमधील 89 प्रभागांमध्ये रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. (Elections for 51 Gram Panchayats in Palghar District Announced Voting will be held on this date next month)

पालघर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या व सरपंच सदस्य पदे रिक्त असलेल्या 100 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (3 ऑक्टोबर) हा कार्यक्रम जाहीर केला आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या सदस्य पदांसाठी या निवडणूका होत असून या ग्रामपंचायतीमध्ये पेट व रिक्त पदाचे सरपंच व सदस्य वर्गासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्याचे मुख्यमंत्री बदलणार? अजितदादांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू; फडणवीसांचं मोठं विधान

जानेवारी 2013 ते डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या, नव्याने निर्माण झालेल्या, तसेच 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. याचबरोबर जून 2023 पर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका येणाऱ्या तालुक्यांमध्ये तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस सहा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करायची आहे.

- Advertisement -

उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा दिनांक 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 25 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. 5 नोव्हेंबरला मतदान होणार असून निकाल 6 नोव्हेंबरला घोषित होईल.

हेही वाचा – पालकमंत्र्यांची नवी यादी : अजित पवारांकडे पुणे तर, चंद्रकांत पाटलांकडे ‘या’ दोन जिल्ह्यांची जबाबदारी

सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायत तालुका ग्रामपंचायती सदस्य 

पालघर – 16

डहाणू – 17

विक्रमगड – 2

जव्हार – 1

वसई – 3

मोखाडा – 4

तलासरी – 8

एकूण – 51

हेही वाचा – ‘या’ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत; 1 हजार 71 कोटी सरकारकडून मान्य

 ग्रामपंचायतीमध्ये होतील निवडणुका

  • पालघर तालुका : सरावली, खैरापाडा, सालवड, खानिवडे, शिरगाव, माहीम, लालोंडे, लालठाणे,मासवण, उच्छेळी, उनभाट, टेंभी खोडावे, चटाळे, जलसार, कपासे, शिल्टे.
  • डहाणू तालुका : आंबेसरी, मोडगाव, कापशी, दाभोण, दापचरी, गांगणगाव, सावटा, बोर्डी, गोवणे, जांबुगाव, किन्हवली, वंकास, राई, सोगवे, चारोटी, दाभाडी, चिंचणी.
  • तलासरी तालुका : गिरगाव, कूझें, घिमानिया, करजगाव, उधवा, कवाडा, वेवजी, उपलाट.
  • विक्रमगड तालुका : चाबके तलावली, मलवाडा.
  • जव्हार तालुका :  वाळवंडा.
  • मोखाडा तालुका :  सायदे, किनिस्ते, चास, डोल्हारा.
  • वसई तालुका : सायवन, अर्नाळा, अर्नाळा किल्ला.

ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात दोन सरपंचपदासह 89 रिक्त 9 पदांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. 6 ऑक्टोबर रोजी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्यावतीने निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 16 ते 23 ऑक्टोबरदरम्यान नामनिर्देशनपत्रे मागविण्याची व सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोललो तर माझी जीभ वितळेल; राजू शेट्टींची बोचरी टीका

पोटनिवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायत 

तालुका –  ग्रामपंचायत-  सदस्य संख्या

पालघर – 16 – 25
डहाणू – 13 – 38 (सरपंच धरून)
विक्रमगड – 2 – 2
जव्हार – 4 – 6
वसई – 2 – 3
वाडा – 8 – 10
मोखाडा – 4 – 4 (1 सरपंच धरून)
तलासरी – 1 – 1
एकूण – 49 – 89

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -