घरमहाराष्ट्रनाशिकआजपासून इंग्रजी माध्यम शाळा सुरू

आजपासून इंग्रजी माध्यम शाळा सुरू

Subscribe

पालकांच्या मनात ‘ओमायक्रॉन’ची भितीही घर करुन

नाशिक : ख्रिसमस नाताळच्या सुट्यांमुळे शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यम शाळा सोमवार (दि.3) पासून सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची मानसिकता तयार झालेली असली तरी ‘ओमायक्रॉन’ची भितीही पालकांच्या मनात घर करुन आहे.

अमेरिका, ब्रिटनमध्ये ‘ओमायक्रॉन’चा वाढता संसर्ग, कॅनडामध्ये झालेला लॉकडाऊन आणि भारतातील वाढती रुग्णसंख्या याकडे इंग्रजी माध्यम शाळांचे लक्ष लागून आहे. या तुलनेत महापालिका, खासगी शिक्षण संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. मात्र, इंग्रजी माध्यम शाळा अजूनही बंद आहेत. काही शाळा सुरू झालेल्या दिसत असल्या तरी अवघे 3 तास विद्यार्थ्यांना शिकवले जाते. शाळा सुरू करण्यापूर्वी स्कूलबस, ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने शिक्षण देण्याची पूर्वतयारी या शाळांनी सुरू केली आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यासाठी शाळांनी पालकांकडून प्रतिक्रिया मागवल्या होत्या. पालकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या असल्या तरी जवळपास 70 टक्के पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास उत्सुक आहेत. परंतु, आता ‘ओमायक्रॉन’चा धोका अधिक वाढू नये, अशी अपेक्षाही शालेय संस्थाचालकांकडून व्यक्त केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेवून मुलांना सोमवारपासून शाळेत पाठवले जाणार आहे.

शाळा सुरु करायच्या म्हटल्या तरी संपूर्ण तयारी करावी लागेल. स्कूलबस, ऑनलाईन व ऑफलाईन शिकवण्याची तयारी करावी लागेल. त्यादृष्टीने शाळा स्तरावर तयारी सुरू असून, सोमवारपासून पूर्ण क्षमतेने शाळा सुरु होतील, यात शंकात नाही.
– सचिन जोशी, संचालक, इस्पॅलियर स्कूल

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -