घरताज्या घडामोडीभाजपने सिंधुदुर्ग बँक निवडणुकीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा स्वाद घेतला, शिवसेनेचा पलटवार

भाजपने सिंधुदुर्ग बँक निवडणुकीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा स्वाद घेतला, शिवसेनेचा पलटवार

Subscribe

सिंधुदुर्ग बँक निवडणुकीमध्ये भाजपने १९ पैकी ११ जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला ८ जागांवर विजय मिळाला आहे. सिंधुदुर्ग बँक निवडणूक शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्यामुळे चांगलीच गाजली आहे. राज्यात इतर जिल्ह्यातही बँकेच्या निवडणुका झाल्या परंतु सिंधुदुर्गात झालेल्या निवडणुका नेहमीच खुनी घटनांमुळे चर्चेत असतात. सिंधुदुर्ग बँकेवर विजय मिळवण्यासाठी खुनाखुनी झाली यामध्ये भाजपनेही दहशतवादी हल्ल्याचा स्वाद घेतला असल्याचे प्रत्युत्तर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून देण्यात आले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र डागण्यात आले आहे. सिंधुदुर्ग बँक निवडणुकीमध्ये झालेल्या घटनांवरुन शिवसेनेने भाजपवर घणाघात केला आहे. भाजपने सिंधुदुर्ग निवडणुकीमध्ये ११ जागांवर विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमध्ये असंसदीय भाषेचा वापर झाला तर निवडणूक रक्तरंजित असते. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीमध्ये दोन्ही राजांमध्ये शाब्दिक जुगलबंदी झाली पण ती निवडणूक रंगतदार ठरली सिंधुदुर्गमध्ये असे काही नसते तिकडे जे असते ते रक्तरंजित असते असे शिवसेनेच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

भाजपने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्याचा स्वाद घेतला

सिंधुदुर्गातील निवडणूक रक्तरंजित असते याचा इतिहास केवळ एका व्यक्तीभोवती फिरत असते. ते म्हणजे श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर हे राजकीय नरबळी आहेत. हे नरबळी कसे गेले याच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहखात्याकडून एसआयटी नेमली पाहिजे. भारतीय सिंधुदुर्गात याच दहशतवादी हल्ल्यांचा पुरेपूर स्वाद घेतला आहे.

नितेश राणेंविरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावा

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमध्ये शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर खुनी हल्ला झाला सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहे. या हल्ल्यात संशयित आरोपी असलेले आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. कोर्टालाही पोलिसांकडे असलेले पुरावे मान्य असल्याचे यावरुन दिसत आहे असे सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिंकल्याने महाराष्ट्रात सत्ताबदल हे अकलेचे तारे

सिंधुदुर्ग जिल्हा बँक राण्यांनी जिंकली हे सत्यच आहे. आता जिल्हा बँकेचा आणि महाराष्ट्राच्या सत्तेचा काही संबंध आहे काय? पण जिल्हा बँकेत ११ जागा जिंकून येताच ”आता लक्ष्य महाराष्ट्र” अशी आरोळी केंद्रीय मंत्री राणे यांनी ठोकली. जिल्हा बँकेचे पॅनल जिंकल्याने महाराष्ट्रासारख्या राज्यात सत्ताबदल होतो, हे वेगळेच अकलेचे गणित यानिमित्ताने समजले. जिल्हा बँक जिंकली म्हणजे जणू जागतिक बँकेवरच विजय मिळवला, असे भाजप पुढाऱ्यांना वाटत असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.


हेही वाचा : …तर लोकांना कळेल चुकीच्या पद्धतीने तक्रार करण्यात आली


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -