घरमहाराष्ट्रनाशिकमनोवेधच्या वतीने नवदुर्गांचा बुधवारी गौरव

मनोवेधच्या वतीने नवदुर्गांचा बुधवारी गौरव

Subscribe

मनोवेध डेव्हलपमेंटल फाऊंडेशन, शोध सुखाचा, हेल्थ व्हू यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त येत्या बुधवारी (दि. ऑक्टोबर) दुपारी वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहातभारत मातेच्या नवरात्रीचा , जागर स्त्री शक्तीचाहा कार्यक्रम होणार आहे. यात राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नऊ कर्तुत्ववान महिनलांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

नवदुर्गेच्या नऊ रुपांची गुणवैशिष्ट्ये असतात. तीच गुणवैशिष्ट्ये अंगी धारण करून अनेक क्षेत्रात भरीव काम करणार्या महिला ह्या आदिशक्तीची जणू रूपेच आहेत. या नवदुर्गांचा गौरव करुन त्यांचा मुलाखतीचा कार्यक्रम मनोवेधच्या वतीने होणार आहे.  या नवदुर्गांशी सुप्रसिद्ध मानस विकास तज्ज्ञ अमोल कुलकर्णी हे संवाद साधणार आहेत. कार्यक्रमात नऊ शाळा, नऊ महाविद्यालये यातील नऊ मुले मुली यांना अभ्यासक म्हणून सहभागी करून नऊ अनोख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

यांचा होणार गौरव

शैलपुत्री : श्रीमती भावना धानोरकर पोलिओने दोन्हीपाय गमावूनही स्वतःच्या पायावर उभे राहून अनेकांना स्वतःच्या पायावर उभे करणार्या पुणे येथील सोफ्टवेअर कंपनीच्या यशस्वी संचालिका.

ब्रह्मचारिणी : सुनीता पाटील नाशिकमधील अमरधाम येथे अंत्यसंस्कार, पार्थिवाची यथासांग सेवा, दुःखी नातलगांचे आधार बनून अविरत, अहोरात्र कार्य करणार्या व्रतस्थ साधक.

- Advertisement -

चंद्रघंटा: रोशनी मुर्तडकराज्य क्रीडा स्पर्धेत तलवारबाजी मध्ये सुवर्णपदक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त नाशिकची युवा खेळाडू.

कुष्मांडा:  मधू चौगावकरस्त्रीवादी विचारसरणीतून प्रेरित होऊन,स्त्री पुरुष समता, स्त्री भ्रूण हत्या विरोधी, लैगिक साक्षरता अशा विषयात समग्र प्रशिक्षणे देण्यासोबत पृथ्वी मातेच्या गर्भाला वाचविण्याकरिता स्वतःचे खासगी जंगल उभारून जैविक कुटुंब साखळी जपणार्या ध्येयवेड्या कर्मयोगिनी.

स्कंदमाता: डॉ . मृणालिनी भरत केळकर :-त्र्यंबकेश्वरी निवृत्तीनाथांच्या वारीला येणार्या हजारो वारकर्यांच्या मूलभूत गरजा भागवितानाच स्वच्छता आणि रोगराई निर्मूलनाकरितानिर्मळ वारीही संकल्पना यशस्वीरीत्या राबविणार्या प्रसिद्ध संवेदनशील डॉक्टर .

कात्यायनी: अरुणा कुंभारकर:- जातपंचायतीच्या दबावातून आपल्याच मुलीची निघृण हत्या करणार्या आपल्या नवर्याला फाशी मिळवून देण्यासाठी आकांताने लढणारी तसेच जातपंचायतीचा नरकासुर उध्वस्त करणारी रणरागिणी .

कालरात्री:  भावना महाजनसहाय्यक पोलीस निरीक्षक. ’निर्भया पथकया महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या समन्वयक कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी.

महागौरी: गोदावरी देवकाते :- गोदा तट रेल्वे स्टेशन हे घर.. भिक्षा मागणे हे जगण्याचे साधन.. अशा प्रतिकूल परिस्थितीत जीवन विकासाचा ध्यास घेऊन शिक्षणाची कास धरत ध्येयपूर्तीकडे जाण्याची धडपड करणारी तरुणी

सिद्धीदात्री: श्रीमती सुचेता उमरर्जीकरसंगीत अलंकार होऊन चाललेली संगीत साधना. समर्थ रामदास स्वामींच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण पी .एच.डी. आणि समोर आलेल्या बिकट प्रसंगाला धैर्याने तोंड देत उद्योजिकेची झेप या तिहेरी भूमिका प्रभावी पणे पार पाडणारे व्यक्तिमत्व .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -